शाहरुख खानच्या घरी नव्या पाहुण्याचं प्लानिंग?

शाहरुख खानच्या घरी नव्या पाहुण्याचं प्लानिंग?

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान त्यांच्या चौथ्या बाळाचं प्लानिंग करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

  • Share this:

22 जानेवारी : शाहरुख खान त्याच्या सिनेमांना आणि त्याच्या करिअरला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. पण आता त्याच्या खासगी आयुष्यातली खास गोष्ट त्यानं मीडियासमोर शेअर केली आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान त्यांच्या चौथ्या बाळाचं प्लानिंग करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

ते झालं असं की, एका कार्यक्रमाच्या शूटिंग दरम्यान शाहरुखला आकांक्षा नाव उच्चारता येत नव्हतं. त्यासाठी तो सारखा रिटेक घेत होता. या सगळ्याला वैतागून तो म्हणाला की, 'हे नाव उच्चारताना मला खूप त्रास होत आहे. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. पण माझ्यासोबत असं कधी होत नाही. मला वाटतं लवकरच माझं चौथं बाळ येणार आहे आणि त्याचं नाव मी आकांक्षा ठेवणार आहे.'

किंग खान शाहरुख नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतो. त्यात तो त्याच्या चौथ्या बाळाविषयी बोलल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. आता शाहरुखने त्यांच्या नव्या पाहुण्याविषयी खरं सांगितलं की मस्ती केली हे आता येता काळच सांगेल.

First published: January 22, 2018, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading