झिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा, बॉक्स ऑफिसवर करणार दमदार कमाई

झिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा, बॉक्स ऑफिसवर करणार दमदार कमाई

शाहरूख खानच्या झिरो चित्रपटामुळे अनुपम खेरच्या चित्रपटाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या झिरोला बॉक्स आॅफिसवर दुसरा स्पर्धक नसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 आॅक्टोबर : शाहरूख खानच्या झिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहरूखच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दुसरा कोणताच स्पर्धेक नसणार आहे. 21 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमा रिलीजच्या तारखेमध्ये बदल करणार असल्याचं म्हटलं जातं होतं. झिरो चित्रपटासोबत आणखी दोन सिनेमे प्रदर्शित होणार असल्यानं सिनेमाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

झिरो सिनेमासोबत अनुपम खेरचा 'दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' आणि हॉलिवूडचा 'अॅक्वामेन' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. पण आता यांच्या तारखेत बदल करण्यात आल्यानं झिरोची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई होणार आहे.

अनुपम खेरचा दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा 14  डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आणि हॉलिवूडचा चित्रपट अॅक्वामेन 7 डिसेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. नाताळच्या दिवसांमध्ये येणारा झिरो चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन

दीपिका-प्रियांकानं लग्नाच्या बाबतीत घेतलाय मोठा निर्णय

स्त्री-अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी वाहिनी सज्ज

शाहरूख खानचा झिरो चित्रपट 21 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टिझरवरून त्याची चर्चा होती. येत्या 2 नोव्हेंबरला सिनेमाचा ट्रेलर येणार आहे. मुख्य भूमिकेत शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्यासोबत बऱ्याच दिवसांनंतर अभय देओलसुद्धा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोन, जुही चावला, करीश्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे. आनंद रायने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एवढी मोठे कलाकार असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गात उत्सुकता वाढत चालली आहे.

First published: October 30, 2018, 10:05 AM IST

ताज्या बातम्या