दिलीप कुमार यांच्या भेटीला शाहरुख खान

दिलीप कुमार यांच्या भेटीला शाहरुख खान

किंग खान शाहरुखने नुकतंच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली. शाहरुख दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचला होता.

  • Share this:

13 फेब्रुवारी : किंग खान शाहरुखने नुकतंच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली. शाहरुख दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचला होता. एवढंच नव्हे तर शाहरुखने त्यांच्याबरोबर काही वेळ एकत्र घालवला.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शाहरुखसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरुख त्यांचा हात हातात घेऊन त्यांना आधार देताना दिसतोय. शाहरुख आणि दिलीप कुमार यांच्या या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शाहरुख खान आणि दिलीप कुमार यांचं अनोखं नातं आहे. सायराबानू आणि दिलीप कुमार किंग खानला आपला मुलगा मानतात. दिलीप कुमार कधीही आजारी पडले तर शाहरुख त्यांना भेटायला जातोच. कधी काळी शाहरुख दिलीप कुमार यांच्या अभिनयाची काॅपी करतोय, असाही आरोप त्याच्यावर होत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 05:46 PM IST

ताज्या बातम्या