छोट्या पडद्यावर किंग खान घेऊन येतोय 'सर्कस'

दूरदर्शननं किंग खानची सर्कस मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतलाय. दूरदर्शनने आपल्या ५९ व्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर शाहरूखची ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 05:41 PM IST

छोट्या पडद्यावर किंग खान घेऊन येतोय 'सर्कस'

मुंबई, 19 सप्टेंबर : शाहरूख खान आणि टीव्ही अशी हिंट दिली तर काय आठवेल तुम्हाला? अर्थातच, शाहरूख खानची सर्कस आणि फौजी मालिका. या मालिकांनी शाहरूखला एक ओळख दिली. तेव्हा तर तो काही सुपरस्टार नव्हता. पण या दोन मालिकांमधून तो घराघरात पोचलाच आणि प्रेक्षकांच्या मनावर त्यानं अधिराज्य केलं.

दूरदर्शननं किंग खानची सर्कस मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतलाय. दूरदर्शनने आपल्या ५९ व्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर शाहरूखची ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री ९.३० वाजता ‘सर्कस’चे प्रसारण होणार आहे.

Loading...

या मालिकेत सुनील शेंडे, रेखा सहाय, रेणुका शहाणे, आशुतोष गोवारीकर हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. शाहरूखने या मालिकेत शेखरन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अजीज मिर्झा आणि कुंदन शहा दिग्दर्शित ही मालिका पाहणे शाहरूखच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक ट्रिट असणार आहे.

शाहरूख खान सध्या झीरो सिनेमात बिझी आहे. कतरिना आणि अनुष्कासोबतच्या या सिनेमाचं शूटिंग संपलंय आणि आता पोस्ट प्राॅडक्शनचं काम सुरू आहे. इकाॅनाॅमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपण हाॅलिवूडला का जात नाही हे सांगितलं. तो म्हणाला मी अॅप्रोच होणार नाही. त्यांना हवं तर मला विचारावं.

शाहरूख खान म्हणाला, बाॅलिवूडमध्ये ओम पुरींनी हाॅलिवूड कल्चर सुरू केलं. प्रियांका चोप्रा तर हाॅलिवूडमध्येच आहे. इरफाननंही हाॅलिवूडपट केलेत. अमितजींनी केलेत. शाहरूख म्हणाला, माझं इंग्लिश चांगलं नाही. मला वाटतं मी हाॅलिवूडसाठी फिट नाही. मी फक्त बाॅलिवूडचाच विचार करतोय. माझी इच्छा आहे की टाॅम क्रूझनं म्हणायला हवं त्याला हिंदी सिनेमात काम करायचंय. तो दिवस सर्वात चांगला असेल.

PHOTOS : 'तारक मेहता'च्या सेटवर परतले डाॅ. हाथी, तुम्ही पाहिलेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...