शाहरूख खानचा पहिला 'टेड टाॅक', जगाला देणार संदेश

शाहरूख खानचा पहिला 'टेड टाॅक', जगाला देणार संदेश

टेड म्हणजे टेक्नाॅलाॅजी,मनोरंजन आणि डिझाइन ( Ted - Technology,Entertainment,Design ). यात अनेक दिग्गजांची भाषणं आहेत. वैज्ञानिक,अध्यापक,व्यावसायिक,संगीतकार, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, धर्मगुरू त्यात आहेत.

  • Share this:

26 एप्रिल : शाहरूख खान आपला पहिला टेड टाॅक करण्यासाठी कॅनडातल्या वैनकूवर शहरात गेला आहे. ही महिती त्याने टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर टाकलीय.

शाहरूखनं आपली सेल्फी पोस्ट करत लिहिलंय, ' वैनकूला गेलो होतो ते 'परदेश'च्या शूटिंगसाठी. आता टेड टाॅकसाठी आलोय.'

टेड टाॅकच्या अध्यक्षा ज्युलिएट ब्लॅक यांनी शाहरूखचं स्वागतच केलंय. शाहरूखनही आपण भाषण करताना विसरणार तर नाही ना,असा मिष्किल प्रश्न केलाय.

टेड टाॅक्स आहे तरी काय ?

टेड म्हणजे टेक्नाॅलाॅजी,मनोरंजन आणि डिझाइन ( Ted - Technology,Entertainment,Design ). यात अनेक दिग्गजांची भाषणं आहेत. वैज्ञानिक,अध्यापक,व्यावसायिक,संगीतकार, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, धर्मगुरू त्यात आहेत. ही सीरिज एक संस्था चालवते.

आता यात अभिनेता शाहरूख खानही सामील झालाय. किंग खान लवकरच भारतात 'टेड टाॅक इंडिया : नई सोच' नावाचा टाॅक शोही सुरू करणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 02:38 PM IST

ताज्या बातम्या