किंग खान करतोय राकेश शर्माला 'सॅल्युट'

किंग खान करतोय राकेश शर्माला 'सॅल्युट'

किंग खानचं झिरो सिनेमाचं काम एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यानंतर तो सॅल्युटच्या तयारीला लागेल.

  • Share this:

12 मार्च : शाहरुख खान सध्या झिरो सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होतोय. त्यानंतर तो ' सॅल्युट' सिनेमा करणार. हा सिनेमा अंतराळवीर राकेश शर्माच्या आयुष्यावर बेतलाय.

किंग खानचं झिरो सिनेमाचं काम एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यानंतर तो सॅल्युटच्या तयारीला लागेल. तीन महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू होईल.

सॅल्युट सुरुवातीला आमिर खान करणार होता. पण काही वैयक्तिक कारणामुळे तो हा सिनेमा करू शकत नव्हता. मग त्यानंच शाहरूखला विचारा म्हणून सांगितलं. असो.

आता राकेश शर्माच्या रूपात किंग खान पाहायला मिळणार एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 09:35 PM IST

ताज्या बातम्या