Home /News /entertainment /

रिअल किंग! अभिनेत्री राजश्री देशपांडेच्या ट्वीटनंतर औरंगाबाद डॉक्टरांना शाहरुखची त्वरित मदत

रिअल किंग! अभिनेत्री राजश्री देशपांडेच्या ट्वीटनंतर औरंगाबाद डॉक्टरांना शाहरुखची त्वरित मदत

मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिनं औरंगाबादमधील डॉक्टरांच्या मदतीसाठी केलेल्या ट्वीटनंतर तात्काळ दखल घेत शाहरुखनं त्यांना मदतीचा हात दिला आहे.

    मुबंई, 29 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. या व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जातच आहे मात्र यासोबत अनेकजण स्वतःला जमेल तसा मदतीचा हात देत आहेत. यात सर्वाधिक योगदान बॉलिवूड आणि मराठी सिने-इंडस्ट्रीतील कलाकारांचं आहे. नुकतंच मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिनं औरंगाबादमधील डॉक्टरांच्या मदतीसाठी केलेल्या ट्वीटनंतर तात्काळ दखल घेत शाहरुखनं त्यांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यात डॉक्टर वापरत असलेल्या पीपीई किटचा सर्वात मोठा हात आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेत हे पीपीई किट सर्वात मोठी भूमिका बजावत आहेत. मात्र अनेक ठिकाणी या किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशात अभिनेत्री राजश्री देशपांडेनं औरंगाबादमधील डॉक्टरांच्या मदतीसाठी एक ट्वीट केलं होतं. तिनं लिहिलं, 'औरंगाबादमध्ये डॉक्टरांसाठी किट उपलब्ध नाहीत. दररोज शंभरपेक्षा अधिक शेतकरी तपासणीला येतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे. मदतीची अपेक्षा आहे' या ट्वीटमध्ये तिनं अभिनेता शाहरुख खानला टॅग केलं होतं. यानंतर शाहरुखनं त्यांना तत्काळ मदत देऊ केली. EXCLUSIVE VIDEO बाहुबलीचा हिंदी आवाज होता या मराठी कलाकाराचा, शेअर केला अनुभव औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा जिल्हा सध्या कोरोना हॉटस्पॉटच्या यादीत येतो. या परिस्थितीत राजश्रीनं केलेल्या मदतीच्या ट्वीटला लगेच प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या काही तासांतच 2500 पीपीई किट औरंगाबाद डॉक्टर्सना पुरवण्यात आले. त्यानंतर लगेच मदत केल्याबद्दल राजश्रीनं शाहरुख खान आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले. (संपादन- मेघा जेठे) आईच्या मृत्यूनंतर इरफान खानची तब्येत बिघडली, कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू टेलिव्हिजनवरील लक्ष्मणाचा या अभिनेत्रीबरोबर रोमान्स, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Shahrukh khan

    पुढील बातम्या