Shocking : शाहरुख खानला कलिंग सेनेची धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

Shocking : शाहरुख खानला कलिंग सेनेची धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

बॉलिवूड स्टार हे देशाचे स्फॉट टार्गेट असतात असं म्हटलं जातं. तसाच काहीास एक प्रकार आता समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : बॉलिवूड स्टार हे देशाचे स्फॉट टार्गेट असतात असं म्हटलं जातं. तसाच काहीास एक प्रकार आता समोर आला आहे. गेल्या काही दिवसांआधी बॉलिवूडचा सुलतान सलामान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तशीच धमकी आता किंग खानलाही देण्यात आली आहे.

शाहरुख खानच्या ओडिशा येण्यावर भुवनेश्वरच्या स्थानिय संस्थेच्या कलिंग सेना याने विरोध दर्शवला आहे. 27 नोव्हेंबरला ओडिशामध्ये आयोजित मेन्स हॉकी वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीसाठी किंग खान जाणार आहे. पण त्याला स्थानिक संस्थेने जोरदार विरोध केला आहे. त्यातून किंग खानली धमकीही देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने किंग खानच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कलिंग सेनाच्या धमकीमुळे ओडिशामध्ये शाहरुखच्या ओडिशा दौऱ्याची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे असं पत्रक पोलिसांनी जारी केलं आहे. शाहरुखच्या चेहऱ्यावर शाही फेकण्य़ाची धमकी कलिंग सेनाने दिली आहे.

कलिंग सेनाने 17 वर्षांआधी रिलीज झालेल्या 'अशोका' या सिनेमावर आक्षेप घेत एका अभिनेत्याच्या चेहऱ्यावर त्याने शाही फेकली होती. तर आता या संस्थेचा आरोप आहे की सिनेमाला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं आहे. त्यामुळे हा आमच्या संस्कृती आणि लोकांचा अपमान आहे. असं म्हणत या संस्थेने शाहरुखला जोरदार विरोध केला आहे.

या सगळ्यावर पोलिसांनी शाहरुखची पोलीस सुरक्षा वाढवली आहे. पण त्यात आता ओडिशामध्ये शाहरुख पोहचल्यावर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

First published: November 25, 2018, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading