अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत दुर्घटना, शाहरुखनं वाचवला ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव!

अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत दुर्घटना, शाहरुखनं वाचवला ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव!

अभिनेत्री ऐश्वर्या रायची मॅनेजर शाहरुख खाननं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे दिवाळीची धूम आहे. अशात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिवाळी पार्ट्यांचं आयोजन केलं होत. बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनीही यंदा सर्वांनी दिवाळी पार्टी दिली. मात्र या पार्टीमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेत अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायची मॅनेजर शाहरुख खाननं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली. टीव्ही अभिनेत्री निया शर्माच्या लेहंग्याला आग लागण्याची घटना ताजी असतानाच बच्चन कुटुंबीयांनी दिलेल्या पार्टमध्ये ऐश्वर्याची मॅनेजर अर्चना सदानंद हिच्याही लेहंग्याला आग लागली मात्र अभिनेता शाहरुख खाननं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अर्चनाचा जीव वाचवला. दरम्यान यात शाहरुखही काही प्रमाणात जखमी झाला असून अर्चनाला नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

‘बढ़ रही है नजदीकियाँ...’ विकी-कतरिनामधील वाढती जवळीक कॅमेऱ्यात कैद!

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननं या घटनेला दुजोरा दिला आहे. फरहाननं एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर करत शाहरुख खानचे आभार मानले आहेत. फराहनं लिहिलं, शाहरुख खान, मोहब्बत मॅन ते सुरक्षा रक्षक. अर्चना लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करते. फराहनं जे कात्रण शेर केलं आहे त्यानुसार अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अचानक अर्चना संदानंद हिच्या लेहंग्या आग लागली आणि ती वाढत गेली. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या शाहरुख धाडस दाखवत अर्चनाला वाचवण्यासाठी पुढे आला आणि ती आग विझवली मात्र यात त्यालाही दुखापत झाली. तर अर्चनाचं 15 % शरीर या आगीत भाजलं आहे.

अर्जुन कपूरआधी बॉलिवूडच्या या खानाशी जोडलं गेलं होतं मलायकाचं नाव

अर्चना सदानंद बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय-बच्चन हिची बऱ्याच काळापासून मॅनेजर आहे. ऐश्वर्याच्या कामातील अनेक महत्त्वाचे निर्णयांमध्ये अर्चनाची प्रमुख भूमिका असते. मिड डेनं प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार अर्चना आपल्या मुलीसोबत या पार्टीमध्ये आली होती. ती कोर्टयार्डमध्ये होती त्यावेळी अचानक तिच्या लेहंग्याला आग लागली. ती मदतीसाठी ओरडत होती मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काय करावं हे समजत नव्हतं. त्यावेळी शाहरुखनं धावत जाऊन आपल्या कोटच्या मदतीनं ही आग विझवली. मात्र यात काही प्रमाणात शाहरुखलाही दुखापत झाली.

दिवाळी साजरी करण्यापासून रोखलं, अभिनेत्यानं ट्विटरवरुन पीएम मोदींकडे मागितली मदत

===================================================================

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

Published by: Megha Jethe
First published: October 30, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading