सुहानाच्या वयाच्या मुलीनं शाहरुखकडे मागितला सल्ला, किंग खाननं दिला 'हा' रिप्लाय

सुहानाच्या वयाच्या मुलीनं शाहरुखकडे मागितला सल्ला, किंग खाननं दिला 'हा' रिप्लाय

नुकत्याच शाहरुखनं #AskSRKच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्याच्या लेकीच्या वयाच्या एका मुलीनं त्याच्याकडे सल्ला मागितला

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान मागच्या काही काळापासून सिनेमांपासून दूर आहे. मात्र तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात मात्र नक्की असतो. नुकत्याच शाहरुखनं #AskSRKच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्याच्या लेकीच्या वयाच्या एका मुलीनं त्याच्याकडे सल्ला मागितला आणि विशेष म्हणजे शाहरुखनं तिला आयुष्यभर लक्षात राहिल असा प्रेरणादायी सल्ला सुद्धा दिला.

ट्विटरवर शाहरुख खानकडून रिप्लाय मिळाल्यावर त्याचे चाहते खूप खूश झाल्याचं दिसलं. या सेशनमध्ये शाहरुखच्या एका चाहतीनं त्याच्याकडे सल्ला मागितला. त्याची ही चाहती शाहरुखची मुलगी सुहानाच्या वयाची आहे. तिनं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं, 'मी सुहानाच्या वयाची आहे. मला तुमच्याकडून एक चांगला सल्ला हवा आहे. तुम्ही माझ्यासाठी असं करु शकता का?'

'ही' अभिनेत्री करतेय स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडलला डेट

या चाहतीच्या प्रश्नावर शाहरुखनं तिला रिप्लाय दिला. शाहरुखनं लिहिलं, ‘आयुष्याच्या प्रवासात कधीच कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा प्रभाव स्वतःवर होऊ देऊ नकोस. तु सुंदर आहेस कारण ही तु आहेस...’

शाहरुखकडून रिप्लाय मिळाल्यावर या चाहतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिनं ट्विटरवरुन या गोष्टीचीही मागहिती दिली की, ती शाहरुखच्या रिप्लायची मागच्या 6 वर्षांपासून वाट पाहत होती. शाहरुखच्या रिप्लायसाठी तिनं त्याला धन्यवाद दिले आहेत.

तारा सुतारियाच्या BIKINI लुकवर चाहते घायाळ, मालदीव व्हेकेशनचे फोटो VIRAL

एका चाहत्यानं ट्विटरवर त्याला मन्नतच्या एका रुमचं भाडं किती आहे असा प्रश्न केला होता आणि विशेष म्हणजे शाहरुखनं त्याच्या या ट्वीटला उत्तरही दिलं होतं. त्यानं लिहिलं, ‘30 वर्षांची मेहनत.’ अर्थात शाहरुखचा हा बंगला कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. पण त्यासाठी शाहरुखनं खूप मेहनतही घेतली आहे. शाहरुखचं हे घर जवळपास 200 कोटी रुपयांचं आहे.

'मी स्मोकर, अल्कोहोलिक होतो...' ज्येष्ठ अभिनेत्यानं उलगडलं पडद्यामागचं आयुष्य

First published: January 24, 2020, 11:08 AM IST

ताज्या बातम्या