इंतजार सुरू, शाहरुख सलमानची 'इशकबाजी' लवकरच!

21 डिसेंबरला झीरो रिलीज होतोय. त्याच सिनेमाचं एक सरप्राइझ आज मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 10:28 AM IST

इंतजार सुरू, शाहरुख सलमानची 'इशकबाजी' लवकरच!

मुंबई, 04 डिसेंबर : बाॅलिवूडचा लग्नाचा मोसम आता ओसरायला लागलाय. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय शाहरुखच्या 'झीरो'कडे. 21 डिसेंबरला झीरो रिलीज होतोय. त्याच सिनेमाचं एक सरप्राइझ आज मिळणार आहे.


झीरोचं आज गाणं लाँच होणार आहे. ते आहे इशकबाजी. हे रोमँटिक गाणं आहे. या गाण्यात शाहरुखबरोबर सलमान खानही दिसणार आहे. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा रोमँटिक अँगलही पोस्टरवर दिसतो.


झिरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयातून प्रक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.

Loading...


त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोन, जुही चावला, करीश्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे.


उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून तयार करण्यात आला आहे.


सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे.


चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...