• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Aryan Khan आर्थर जेलमध्ये गेल्याने शाहरुख- गौरीची कशी झाली अवस्था; जवळच्या माणसाने सांगितलं सत्य

Aryan Khan आर्थर जेलमध्ये गेल्याने शाहरुख- गौरीची कशी झाली अवस्था; जवळच्या माणसाने सांगितलं सत्य

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर शांतता पसरली आहे.

  • Share this:
    मुंबई , 11 ऑक्टोबर : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर शांतता पसरली आहे. शाहरुख आणि पत्नी गौरी खान हे भावनिक दृष्ट्या पूर्णत: खचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कुणालाही भेटले नसून माध्यमांपासूनही त्यांनी अंतर ठेवले आहे, असे शाहरुखच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे. Bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार शाहरुख या प्रकरणानंतर असहाय्य झाला असून तो खूप दु:खी आहे. त्याला झोपही लागत नसून खाण्यापिण्याकडेही दूर्लक्ष करत आहे. वडील म्हणून तो पूर्णत: खचला आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवू़ड कलाकार शाहरूखच्या पाठिशी उभे राहिल्याचे दिसत आहेत.
    आर्थर रोड जेलमध्ये आर्यन गेल्या काही दिवसांपासून NCB नं Cordelia क्रूझवर केलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरु आहे. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनला जेलमधील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. यावेळी जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न मिळणार नाही. त्याला फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे. वाचा : रिव्हर्स ऑर्डरमध्ये शूट करण्यात आला होता रणबीर कपूरचा 'रॉकस्टार'; जाणून घ्या किस्सा आर्यनसह या प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींना देखील तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन धमेचा सहित दोन महिला आरोपींची रवानगी भायखळा जेलमध्ये करण्यात आली आहे. एनसीबीच्या माहितीनुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की तो चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून लक्झरी क्रूझवर गेला होता. जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल या सर्व प्रकरणानंतर शाहरूखने त्याचा आगामी पठाण या चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवलेले आहे. सध्या शाहरूख या प्रकारणामुळे पूर्णपणे खचला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published: