शाहरुखच्या 'डाॅन 3'ची ही नवी माहिती आली समोर

शाहरुखच्या 'डाॅन 3'ची ही नवी माहिती आली समोर

2010मध्ये शाहरुखनं डाॅन 2 सिनेमा केला होता. तो बाॅक्स आॅफिसवर प्रचंड चालला होता. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती डाॅन 3 सिनेमाची.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : सध्या बाॅलिवूडचा किंग खान बिझी आहे त्याच्या झीरो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये. येत्या शुक्रवारी झीरो रिलीज होतोय. त्यानिमित्तानं शाहरुख मीडियाशी संवाद साधतोय आणि अनेक नव्या बातम्या देतोय.

अशीच एक बातमी मिळालीय ती डाॅन 3 सिनेमाची. 2010मध्ये शाहरुखनं डाॅन 2 सिनेमा केला होता. तो बाॅक्स आॅफिसवर प्रचंड चालला होता. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती डाॅन 3 सिनेमाची. आणि या सिनेमाचं प्री प्राॅडक्शन काम सुरू झालंय.

एक्सेल इंटरटेनमेंटची निर्मिती असेल. किंग खानला सिनेमाची कन्सेप्ट आवडलीय. तो काम करायला तयार आहे. आता शोध सुरू आहे नायिकेचा. पुढच्या वर्षी शाहरुख याची आॅफिशियल घोषणा करेल. हा सिनेमा 2020मध्ये रिलीज होईल.

शाहरुख खानच्या झीरो चित्रपटाचा रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. आक्षेपार्ह दृष्य चित्रपटातून वगळ्याची मागणी याचिकाकर्त्यांनी घेतली होती. ही सर्व आक्षेपार्ह दृष्य चित्रपटातून वगळ्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आल्यानं याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे शाहरुखचा झीरो सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

शाहरूख खानचा आगामी सिनेमा झीरो विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका  दाखल करण्यात आली होती. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत केला होता. अमृतपाल सिंह खालसा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सेन्सॉर बोर्डाला निर्देश देऊन आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून काढून टाकण्याचे निर्देश देण्याची हायकोर्टाकडे मागणी करण्यात आली होती. ती सर्व दृष्य आता चित्रपटातून काढून टाकण्यात आली आहेत.

चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 04:59 PM IST

ताज्या बातम्या