शाहरुख खान दिवाळीत कुणाला करतोय मिस?

शाहरुख खान दिवाळीत कुणाला करतोय मिस?

शाहरुखच्या घरच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्याची पत्नी गौरी खानने सोशल मीडियावर टाकले आहेत. मूड लायटिंग असं म्हणत गौरीनं हे शानदार फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यावर शाहरुखचं काय म्हणणं आहे पाहा...

  • Share this:

शाहरुखच्या घरच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्याची पत्नी गौरी खानने सोशल मीडियावर टाकले आहेत. मूड लायटिंग असं म्हणत गौरीनं हे शानदार फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

आपल्या वाढदिवासाच्या जंगी सेलिब्रेशननंतर आता शाहरुखच्या मन्नतमध्ये दिवाळी जोरात आहे. या फोटोंना रीट्विट करताना शाहरुखनं एक मेसेज लिहिलाय ज्यात त्यानं भावुकपणे आपल्या मोठ्या मुलाचं आर्यनचं नाव घेतलंय.

या फोटोंमध्ये शाहरुख पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि धाकटा मुलगा अब्रामसोबत दिसतोय. 'अरे यार मिसिंग लिटिल आर्यन', असं लिहित शाहरुखनं त्याच्यातल्या भावुक पित्याचं दर्शन चाहत्यांना घडवलं.

शाहरुखच्या झीरो सिनेमाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. त्यानंतर त्याच्या घरी दिवाळी पार्टी झाली त्याला बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अभिनेता शाहरुख खानने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. २ ऑक्टोबरला शाहरुखच्या झिरो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे बॉलिवूडमधील तारका शुभेच्छा देण्यासाठी पार्टीला पोहचल्या. यावेळी प्रत्येक अभिनेत्रीचा हटके अंदाज पहायला मिळाला.

केदारनाथ सिनेमातून बॉलिवडमध्ये प्रवेश करणारी सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान पार्टीला हजर होती. सैफ आणि शाहरुखने कल हो ना हो चित्रपटात एकत्र काम केलं आहे. गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये सारा अली खान फारच सुंदर दिसत होती.

‘जब तक है जान’ चित्रपटानंतर ‘झिरो’ चित्रपटात कतरिना आणि शाहरुख एकत्र दिसणार आहे. शाहरुखच्या दिवाळी पार्टीला कतरिना कैफने हजेरी लावली होती. ब्लॅक ड्रेसमध्ये कतरिना फारच हॉट दिसत होती.

सलमान खानची बहिण अर्पिता खान देखील शाहरूखच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये उपस्थित होती. त्याचबरोबर दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि शिल्पा शेट्टीसोबत तिने फोटोसुद्धा काढला.

रेस-3 चित्रपटातून सध्या झळकलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या दिवाळी पार्टीत दिसून आली. शाहरुख खानबरोबर तिने एकही सिनेमा केला नसला तरी शाहरुखच्या पार्टीला जाण्यासाठी ती खूपच सजलेली दिसली.

शाहरुखच्या दिवाळी पार्टीला जाण्याचा मोह काजोलसुद्धा आवरता आला नाही. म्हणूनच दिवाळी साजरा करण्यासाठी काजोल शाहरुखच्या पार्टीला पोहचली.

डिअर जिंदगी चित्रपटातून आलिया आणि शाहरुखचं घट्ट नातं पाहिलं आहे. त्यामुळे आलिया भट्टला पार्टीचं आमंत्रण देण्यात आलं होतं. ब्लॅक ड्रेसमधला आलिया भट्टचा लुक फारच छान दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 08:16 PM IST

ताज्या बातम्या