शाहरुख खानच्या लेक झाली हिरोईन, पाहा पहिल्या फिल्मचा VIDEO

शाहरुख खानच्या लेक झाली हिरोईन, पाहा पहिल्या फिल्मचा VIDEO

शाहरुखची लेक सुहाना खानच्या अ‍ॅक्टिंग डेब्यूची प्रतिक्षा आता संपली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा मागच्या काही काळापासून खूप जोरदार सुरु आहे. अशातच आता सुहानाची पहिली शॉर्ट फिल्म ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ रिलीज झाली असून यातून सुहानाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे. 10 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये सुहानानं चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तिनं संवाद बोलण्यावरही चांगलं काम केलेलं दिसत आहे.

सुहाना खानची ही शॉर्ट फिल्म एक यंग कपलची कथा आहे. दोन दिवसांच्या रोड ट्रिपमध्ये हे कपल त्यांच्या रिलेशनशिपच्या सत्याला सामोरं जातं. इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या द ग्रे पार्ट ऑफ ब्लूचं दिग्दर्शन थियोडर गिमेनोनं केलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना व्यतिरिक्त रोबिन गोनेला मुख्य भूमिकेत आहे.

सलमान, शाहरुख आणि आलियासह बॉलिवूड कलाकार एकाच थाळीत...

मागच्या काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क फिल्ममधील सुहानाच्या नाटकाचे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यात ती डान्स करताना दिसत आहे. सुहाना अभिनय क्षेत्रात एंट्री करणार असल्याचं शाहरुखनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं. तो म्हणाला, की सुहाना अभिनेत्री व्हायचं आहे आणि मी तिला पूर्ण सपोर्ट करणार पण त्याआधी तिनं तिचं शिक्षण पूर्ण करावं असं मला वाटतं.

अभिनेत्री शमा सिकंदरचा BOLD अवतार, व्हायरल झाले PHOTOS

नवाझ-अथियाला पायरसीचा फटका, 'या' वेबसाइटवर 'मोतीचूर-चकनाचूर' झाला लीक

======================================================================

First published: November 19, 2019, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading