शाहरुख खानची लेक सुहाना झाली ग्रॅज्यूएट, मिळाला 'हा' खास पुरस्कार

Shahrukh Khan | Gauri Khan | Suhana Khan Graduation | सुहाना नुकतीच ग्रॅज्यूएट झाली असून तिच्या या सेरेमनीचे फोटो शाहरुख आणि गौरीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 02:19 PM IST

शाहरुख खानची लेक सुहाना झाली ग्रॅज्यूएट, मिळाला 'हा' खास पुरस्कार

मुंबई, 29 जून : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसोबतचे फोटो शेअर केल्यानं सोशल मीडियावर चर्चेत आली होती. या फोटोंमध्ये तिचे काही मित्र शर्टलेस असल्यानं नेटकऱ्यांनी भारतीय संस्कृतीची आठवण करुन देत सुहानाला ट्रोल केलं होतं. पण या व्यतिरिक्तही सुहाना अनेक वेगळ्या कारणांनी चर्चेत असते. पण सध्या पुन्हा एकदा सुहाना चर्चेत आली आहे ती तिच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीमुळे. सुहाना नुकतीच ग्रॅज्यूएट झाली असून तिच्या या सेरेमनीचे फोटो शाहरुख आणि गौरीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. यासोबतच सुहानाला तिच्या स्कूलमधून खास अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे.

दीपिकानं सांगितलं ‘83’मध्ये रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याचं कारण

सुहानानं लंडनच्या Ardingly College मधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. तिच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीच्या वेळी तिच्यासोबत शाहरुख आणि गौरी खान दोघंही उपस्थित होतं. सुहानाची आई गौरी खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुहानाचा एक फोटो शेअर करत, माझी मुलगी सुहाना आता ऑफिशिअली ग्रॅज्यूएट झाली एवढंच नाही तर तिला कॉलेज कडून तिला विशेष पुरस्कारही देण्यात आला. सुहानानं कॉलेजमधील ड्रामा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असे आणि तिच्या या योगदानसाठी तिला कॉलेज कडून विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

मलायकानं शेअर केला पोल डान्स पोजमधला फोटो, अर्जुननं कमेंटमध्ये केली ‘ही’ मागणी

Loading...

 

View this post on Instagram

 

Lunch at Ardingly.. Graduation

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

शाहरुख खाननं सुद्धा गौरी आणि सुहानासोबत फोटो त्याच्या इन्स्टाग्राम शेअर केला. या फोटोला शाहरुखनं ‘शेवटचा पिझ्झा... शेवटचा ट्रेनचा प्रवास... खऱ्या आयुष्यात पहिलं पाऊल... कॉलेज संपलं... शिक्षण नाही’ असं कॅप्शन दिलं. तसेच गौरी खाननं सुहानाचा अवॉर्ड घेतानाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

World Cup- स्पृहाने विराटची डोकेदुखी केली दूर!

सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी सुहाननं आपलं शिक्षण पूर्ण करावं असं शाहरुखला वाटत होतं. पण आता सुहानचं ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानं ती लवकरच डेब्यू करेल अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एका मॅग्झीनसाठी फोटोशूट केलं होतं ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुहानाचं कौतुक झालं होतं.

===========================================================

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...