शाहरुख खानच्या लेकीचा नवीन व्हायरल व्हिडीओ पाहिला का?

शाहरुख खानच्या लेकीचा नवीन व्हायरल व्हिडीओ पाहिला का?

या अगोदरही अनेकदा डान्स किंवा अ‍ॅक्टिंग करतानाचे सुहानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 मार्च : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चर्चा आहे. कुणी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतंय तर कोणाची बॉलिवूड पदार्पणाची तयारी सुरू आहे. यातीलच एक स्टार किड सुहाना खान. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सुहानाचा मोठा चाहता वर्ग आहे. लोकप्रिय स्टारकिड्स असल्यानं ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सुहाना पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सुहानच्या इन्स्टाग्रामवरच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला होता. हा व्हायरल व्हिडीओ एका डान्स ट्रेनिंग सेंटरमधला असून सुहाना सोबत तिचे काही मित्रही डान्स करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

सुहाना एका डान्स ट्रेनिंग सेंटरमध्ये आपल्या मित्रांसोबत केनी लॉगिन्सच्या 'फुटलूज' या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. याच डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या अगोदरही अनेकदा डान्स किंवा अ‍ॅक्टिंग करतानाचे सुहानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.सुहानाला अभिनयाची आवड असून याआधी तिचा कॉलेजच्या ड्रामा प्रोजेक्टमध्ये अ‍ॅक्टिंग करतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

सुहानाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याविषयी बोलताना शाहरुखनं बॉलिवूड पदार्पण ही पूर्णतः तिची निवड असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण त्याआधी तिनं आपलं शिक्षण पूर्ण करायला हवं. ते झाल्यावर ती बॉलिवूड पदार्पणाविषयी विचार करू शकते, असंही तो पुढे म्हणाला होता. सुहानानं काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून सुहानाच्या चाहत्यांना तिच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रतीक्षा आहे.

First published: March 11, 2019, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading