• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'या' सिनेमातून शाहरुखची लेक आणि बिग बींचा नातू करणार Bollywood मध्ये डेब्यू?

'या' सिनेमातून शाहरुखची लेक आणि बिग बींचा नातू करणार Bollywood मध्ये डेब्यू?

काही दिवसांपासून जोया अख्तरच्या चित्रपटातून काही स्टार किड अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान

 • Share this:
  मुंबई, 12 नोव्हेंबर-  जोया अख्तरने  (Zoya Akhtar)  सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या 'द आर्चीज' (The Archies)  या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आर्ची कॉमिक्सच्या धर्तीवर ती एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. तिने  इंस्टाग्रामवर आर्ची कॉमिक्सचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. जोयाचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येणार आहे. या वृत्ताने सर्व तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल काहीही सांगितले नसले तरी प्रेक्षकांना आतापासून हा अनोखा चित्रपट हवा आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

  मात्र, काही दिवसांपासून जोया अख्तरच्या चित्रपटातून काही स्टार किड अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर जोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान सैफ अली खानचा मुलगा आणि साराचा भाऊ इब्राहिम अली खान यांचीही चर्चा झाली होती. आतापर्यंत यापैकी एकाही स्टार किडने चित्रपटात काम केल्याची कबुली दिलेली नाही किंवा जोयाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. चाहते अजूनही त्यांच्या अधिकृत वक्तव्याची वाट पाहात आहेत. जोयाने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केल्यापासून या स्टारकिड्सच्या पदार्पणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमधील स्टार किड डेब्यू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात किशोरवयीन मित्रांची कथा दाखवण्यात येणार असल्याचे दिग्दर्शकाच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. चार मित्रांचा या चित्रपटात लव्ह ट्रँगल दाखवण्यात येणार आहे.जोया आणि रीमा कागती या चित्रपटासाठी एकत्र आल्या आहेत. हा म्युजिक ड्रामा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जोयाने आर्ची कॉमिक्सचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ही पोस्ट 12 तासांपूर्वी शेअर करण्यात आली आहे. ज्यावर 12 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही जोयाच्या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो, की आर्ची कॉमिक्स जगभरातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचे देसी व्हर्जन पाहण्यासाठी चाहते आता आतुर झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: