Home /News /entertainment /

शाहरुखची सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण; चाहत्यांचे मानले आभार

शाहरुखची सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण; चाहत्यांचे मानले आभार

आजवर अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शाहरुखने एका मालिकेतून आपल्या अभिनय वाटचालीला सुरूवात केली होती.

  मुंबई 25 जून: बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) ला आता चित्रपटसृष्टीत तब्बल 30 वर्षे पूर्ण झाली आहे. आजवर अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शाहरुखने एका मालिकेतून आपल्या अभिनय  वाटचालीला सुरूवात केली होती. तर त्याआधी अनेक नाटकांतही त्याने काम केलं होतं. फार मेहनतीनंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. व त्याने त्या संधीचं सोनं करत कधीच मागे वळूनही पाहीलं नाही. तर आता त्याला या सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. याविषयी त्याने एक भावूक पोस्ट करत त्याच्या लाखो जगभरातील चाहत्यांचे आभार मानले आहेत.

  करण जोहरमुळं बिग बींच्या लेकीवर आली उपाशी झोपण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल थक्क

  त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘गेल्या 30 वर्षांपासून तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात. माल जाणीव झाली की माझं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य तुमचं मनोरंजन करण्यात गेल आहे. उद्या वेळ काढून प्रत्यक्षात तुम्हाला भेटून प्रेम वाटेन. तुमच्या प्रेमासाठी खूप धन्यवाद.’ शाहरुखच्या या पोस्टनंतर त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला ट्वीट करत रिप्लाय द्यायला सुरूवात केली. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला अनेक शुभेच्छा ही दिल्या आहेत. अनेकदा शाहरुख #asksrk हा चॅट सेशनही करत असतो. यात तो त्याच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या ट्वीट्सना रिप्लाय करतो. ‘दिवाना’(Deewana) या चित्रपटातून शाहरुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘दिल तो पागल है (Dil To Pagal Hai )’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.  तर टीव्हीवरील फौजी या चित्रपटातून त्याने छोट्या पडद्यावर अभिनय करयाला सुरूवात केली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Shah Rukh Khan

  पुढील बातम्या