मुंबई, 28 मार्च : शाहरुख खानने छोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1989 साली आलेल्या सर्कस या मालिकेतून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याची पहिलीच मालिका हिट ठरली होती. या मालिकेमुळे शाहरुखच नशीब चमकला आणि त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. नंतर जे घडलं ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सर्कस मध्ये शाहरुख सोबत एका मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. हा अभिनेत्री शाहरुखची पहिली हिरोईन ठरली होती. तिच्या आयुष्यात मात्र तिने चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायकाशी लग्न केलं.
शाहरुखची पहिली नायिका होती प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे. रेणुका शहाणे 'हम आपके है कौन', 'खिचडी' यांसारख्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी खऱ्या आयुष्यात आशुतोष राणासोबत लग्नगाठ बांधली. आशुतोष राणा यांनी 'दुष्मन' आणि 'संघर्ष' यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना अक्षरशः घाबरवले होते.
'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर कुठे गायब झाला अभिनेता?
रेणुका यांचे पहिले लग्न मराठी लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाले होते, परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर रेणुका आशुतोषला भेटली. हंसल मेहता दिग्दर्शित 'जयते' या चित्रपटाच्या निमित्ताने ते पहिल्यांदा भेटले होते. रेणुका आणि आशुतोष संपर्कात राहिले. जवळपास 3 महिने ते एकमेकांशी फोनवरून बोलत राहिले आणि नंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
रेणुका आशुतोषशी लग्न करण्याचा निर्णय घेत असल्याचं तिच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना आश्चर्य वाटलं. लोकांना वाटत होते की त्यांचे लग्न एक महिना किंवा वर्षभर जास्त टिकणार नाही. ती म्हणाली होती, 'जे काही बोलले आणि केले गेले ते चुकीचे होते.' तिने सांगितले की एका महिलेला लग्न यशस्वी करण्यासाठी खूप तडजोड करावी लागते आणि त्यांचा पतीसोबतचा प्रवास आतापर्यंत चांगला आहे.
रेणुकाने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या लग्नावर लोकांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. ती म्हणाली होती कि, 'बरेच जण मला म्हणाले होते- हे तू काय करतेयस? तू या व्यक्तीसोबत लग्न करत आहेस' असं म्हणाले होते. पण मी त्यांना आता तुम्ही आशुतोषची काळजी करायला हवी, मी स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे, असं सांगितलं.' रेणुका यांच्या या उत्तराने सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. रेणुका मुंबईत लहानाची मोठी झाली, तर आशुतोष गावातील एका मोठ्या कुटुंबातील आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Renuka Shahane, Shahrukh Khan