मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुख खान 'पठाण' च्या शूटिंगवर परतणार; अभिनेता स्पेनसाठी होणार रवाना

शाहरुख खान 'पठाण' च्या शूटिंगवर परतणार; अभिनेता स्पेनसाठी होणार रवाना

 शाहरुख खानसाठी  (Shahrukh Khan)  शेवटचा महिना आयुष्यातील कधीही न विसरणाऱ्या महिन्यांपैकी एक आहे. मुलगा आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखला आपल्या डोळ्यांसमोर मुलाला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडता येत आहे. मुलगा घरी परतल्यानंतर आता शाहरुखही आपल्या कामावर परतणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 नोव्हेंबर-   शाहरुख खानसाठी  (Shahrukh Khan)  शेवटचा महिना आयुष्यातील कधीही न विसरणाऱ्या महिन्यांपैकी एक आहे. मुलगा आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखला आपल्या डोळ्यांसमोर मुलाला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडता येत आहे. मुलगा घरी परतल्यानंतर आता शाहरुखही आपल्या कामावर परतणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर किंग खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण'  (Pathan)  या सिनेमात तो दिसणार आहे. चित्रपटाचा काही भाग शूटदेखील झाला आहे.पण अजून काही भाग बाकी आहे, त्यासाठी शाहरुख लवकरच स्पेनला जाणार आहे.

शाहरुख खान लवकरच दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'पठाण' आणि अटलीच्या 'लायन' या चित्रपटात दिसणार आहे. मुलगा अडचणीत असल्याचे पाहून किंग खानने आपल्या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले होते. आमच्या संलग्न वेबसाइट न्यूज18 इंग्लिशच्या एका बातमीनुसार, शाहरुखने आता यशराज फिल्म्सला 'पठाण'च्या पुढील शेड्यूलसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

खरंतर आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानला आता खूप दिलासा मिळत आहे. कामाला लागण्यापूर्वी त्याने काही वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, कुटुंबासोबत काही वेळ घालवल्यानंतर अभिनेत्याने 'पठाण' चित्रपटाच्या स्पेन शेड्यूलला होकार दिला आहे. आता सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुढील महिन्याच्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.रिपोर्टमध्ये सूत्राच्या हवाल्याने पुढे म्हटले आहे की स्पेनमध्ये काही न पाहिलेली ठिकाणे आहेत, ज्यांना शूटिंगसाठी अंतिम रूप देण्यात आले आहे. 'सेव्हिल', 'मालार्का', 'कार्डेझ', 'जेरेझ दे ला फ्रोंटेरा', 'वाल्डेमोसा', 'रियाध लोलिता तारिफ' यांसारखी काही ठिकाणे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. ही अशी ठिकाणे आहेत जिथे याआधी बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग झालेले नाही. 'पठाण'ची टीम येथे शाहरुख आणि दीपिका पदुकोणच्या जोडीसोबत दोन रोमँटिक गाणी शूट करणार आहे.

(हे वाचा: Cruise Drug Case: NCB च्या धाडीआधीच किरण गोसावीनं रचला होता ‘हा’ मोठा कट)

रोमँटिक गाण्यांव्यतिरिक्त, काही अॅक्शन सीक्वेन्स देखील आहेत, ज्याचे शूटिंग स्पेनमध्ये देखील केले जाईल. अ‍ॅक्शन सिक्वेन्स कोरिओग्राफ करण्यासाठी एका नवीन आंतरराष्ट्रीय अॅक्शन डायरेक्टरची नियुक्ती केली जात आहे. शाहरुखशिवाय जॉन अब्राहम देखील शूटिंगचा भाग असणार आहे. संपूर्ण युनिट वेळापत्रकाची तयारी करत आहे. चित्रपटाचा VFX YRF च्या व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ YFX आणि रेड चिलीज VFX द्वारे संयुक्तपणे केला जात आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shahrukh khan