मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुख खान-साऊथ सुपरस्टार थलापती विजय झळकणार एकत्र; 'त्या' पोस्टची होतेय तुफान चर्चा

शाहरुख खान-साऊथ सुपरस्टार थलापती विजय झळकणार एकत्र; 'त्या' पोस्टची होतेय तुफान चर्चा

  शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. त्याचे चाहते त्याला प्रचंड मिस करत आहेत. मात्र आता शाहरुख खान अनेक प्रोजेक्ट्ससोबत दमदार एन्ट्री करणार आहे.

शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. त्याचे चाहते त्याला प्रचंड मिस करत आहेत. मात्र आता शाहरुख खान अनेक प्रोजेक्ट्ससोबत दमदार एन्ट्री करणार आहे.

शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. त्याचे चाहते त्याला प्रचंड मिस करत आहेत. मात्र आता शाहरुख खान अनेक प्रोजेक्ट्ससोबत दमदार एन्ट्री करणार आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 23 सप्टेंबर-   शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. त्याचे चाहते त्याला प्रचंड मिस करत आहेत. मात्र आता शाहरुख खान अनेक प्रोजेक्ट्ससोबत दमदार एन्ट्री करणार आहे. दरम्यान शाहरुख खान आपल्या आगामी 'जवान' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात बॉलिवूड किंग साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारासोबत दिसणार आहे. साऊथ दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या टीजरपासूनच शाहरुख आणि नयनताराच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून आहे. दरम्यान आता या चित्रपटात आणखी एका साऊथ सुपरस्टारची एन्ट्री झाली आहे. नुकतंच याबाबतचा रिपोर्ट समोर आला आहे. 'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीने नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढिदवसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोमध्ये एटलीसोबत एका बाजूला शाहरुख खान आणि दुसऱ्या बाजूला सूट सुपरस्टार थलापती विजय दिसून येत आहे. हा फोटो समोर येताच विजय शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या फोटोंवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड किंग आणि साऊथ सुपरस्टारला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक झाले आहेत. तसेच दिग्दर्शक एटलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतंच आपला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये ते विजय आणि शाहरुख खानसोबत उभे आहेत. या तिघांनीही ब्लॅक आऊटफिट्स घातला आहे. ती बहुतेक पार्टीची थीम असल्याचा अंदाज लावला जात आहे. सोबतच एटलीने फोटोला हटके कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांनी कॅप्शन देत लिहलंय, 'माझ्या बर्थडेला मी यापेक्षा जास्त आणखी काय मागू शकतो. आजपर्यंतचा सर्वात खास बर्थडे, माझ्या दोन्ही आधारस्तंभासोबत.. असं म्हणत एटलीने सर्वांना विचारात टाकलं आहे. या पोस्टमुळे विजय शाहरुखसोबत 'जवान'मध्ये दिसणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र चित्रपटाच्या टीमकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. (हे वाचा:Bipasha Basu: बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हरने केलं डोहाळ जेवणाचं आयोजन; ड्रेसकोड आहे फारच खास ) 'जवान' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2 जून 2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानची पत्नी गौरी खान या चित्रपटाची निर्माती आहे. शाहरुख खान आणि नयनतारासोबत या चित्रपटात साऊथचा आणखी एक सुपरस्टार विजय सेतुपतीसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान थलापती विजय चित्रपटात दिसणार की नाही यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shahrukh khan

पुढील बातम्या