'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र

'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र

शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या शत्रुत्वाबद्दल जितकी चर्चा झाली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या मैत्रीच्या गोडव्याबद्दल झालीय.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर :  शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या शत्रुत्वाबद्दल जितकी चर्चा झाली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या मैत्रीच्या गोडव्याबद्दल झालीय. आता तर अनेकदा ते एकमेकांसोबत दिसतात. कधी प्रमोशन करतात, कधी छोट्या पडद्यावर एकत्र धमाल. पण आता फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे.

सूत्रांच्या बातमीनुसार शाहरूख आणि सलमान लवकरच एका सिनेमात एकत्र झळकणार आहेत. तो सिनेमा कोणाचा आहे ठाऊकेय? दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा. हा सिनेमा नक्की काय आहे? तेही एक सरप्राईझ आहे.

हा सिनेमा आहे सौदागरचा रिमेक. पटकथा पूर्ण व्हायला अजून 9 महिने लागणार आहेत. दिलीप कुमार आणि  राज कुमार यांच्या भूमिकांमध्ये शाहरूख-सलमान दिसतील. पटकथा पूर्ण झाली की संजय लीला भन्साळी दोघांशी बोलणार  आहेत.

सलमान-शाहरूखनं करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारें हैं सनम या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. काल शाहरूखच्या झीरोचा ट्रेलर रिलीज झाला.

झिरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रत्येक वेळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.

त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, जुही चावला, करीश्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे. एवढे दिग्गज कलाकार असलेला हा सिनेमा येत्या 21 डिसेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य

First published: November 4, 2018, 9:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading