जेव्हा वसईमध्ये हेलिकाॅप्टरमधून उतरतात शाहरूख-कॅट!

जेव्हा वसईमध्ये हेलिकाॅप्टरमधून उतरतात शाहरूख-कॅट!

शाहरुख आणि कतरिना सध्या सिनेमाच्या शूटसाठी चक्क हेलिकॉप्टरनंच वसईला जातायत. सेटवर पोहचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून त्यांनी हा मार्ग निवडलाय.

  • Share this:

06 एप्रिल : शाहरुख खान आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या या सिनेमाचं शूटिंग सध्या वसईमध्ये सुरू आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यात बराच वेळ वाया जात असल्याने शाहरुख आणि कॅटने शूटिंगला पोहचण्यासाठी एक उत्तम उपाय शोधून काढलाय.

शाहरुख आणि कतरिना सध्या सिनेमाच्या शूटसाठी चक्क हेलिकॉप्टरनंच वसईला जातायत. सेटवर पोहचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून त्यांनी हा मार्ग निवडलाय. शाहरुख-कॅटचे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतायत.

First Published: Apr 6, 2018 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading