मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लेकाला धक्क्यातून सावरण्यासाठी Shahrukh-Gauri ची धडपड; जेलबाहेर येताच Aryan Khan साठी तयार खास Diet plan

लेकाला धक्क्यातून सावरण्यासाठी Shahrukh-Gauri ची धडपड; जेलबाहेर येताच Aryan Khan साठी तयार खास Diet plan

आर्यन खान (Aryan Khan) तब्बल 28 दिवसांनंतर तुरुंगातून परतला आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या धक्क्यातून त्याला उभं करण्यासाठी शाहरुख खान (Shahrukh khan) आणि गौरी खानने (Gauri khan) खास तयारी केली आहे.

आर्यन खान (Aryan Khan) तब्बल 28 दिवसांनंतर तुरुंगातून परतला आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या धक्क्यातून त्याला उभं करण्यासाठी शाहरुख खान (Shahrukh khan) आणि गौरी खानने (Gauri khan) खास तयारी केली आहे.

आर्यन खान (Aryan Khan) तब्बल 28 दिवसांनंतर तुरुंगातून परतला आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या धक्क्यातून त्याला उभं करण्यासाठी शाहरुख खान (Shahrukh khan) आणि गौरी खानने (Gauri khan) खास तयारी केली आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : मुंबई ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise drug case) शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) तब्बल 28 दिवसांनंतर तुरुंगातून (Arthur Road Jail) घरी परतला आहे. मन्नतच्या बाहेर आणि मन्नतच्या आतमध्ये कुटुंबाने आर्यनचे जोरदार स्वागत केलं आहे. मागचे 28 दिवस आर्यनसाठी खूपचं वाईट होते. तुरुंगातील ते दिवस आर्यन कधीच विसरू शकणार नाही. याची जाणीव आर्यनचे आई वडील शाहरूख आणि गौरीला (Gauri khan) देखील आहे. म्हणूनच आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. तसेच आता आर्यनच्या मनस्थितीचा विचार करूनच शाहरुख आणि गौरीने मिळून त्याच्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन (Special diet plan for Aryan Khan)   तयार केला आहे. या डाएट प्लॅनमध्ये काऊन्सिलिंगपासून हेल्थ चेकअपपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. कमी वयात तुरूंगात जावं लागणं तसंच वादाच अडकणे, या सर्व गोष्टी मानसिक आरोग्यावर परिणामकारक ठरू शकतात. म्हणूनच शाहरुख आणि गौरीने मिळून त्याच्यासाठी एक स्पेशल रूटीन प्लॅन तयार केला आहे. या सर्व प्रकरणातून आपला मुलगा लवकरात लवकर बाहेर पडावा म्हणून दोघांनीही खास तयारी केली आहे. वाचा :आर्यन खान तुरुंगाबाहेर, पण अरबाज- मुनमुन अजूनही तुरुंगातच; कधी होणार सुटका? ‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान हा घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्याच्या अनेक आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. यावेळी त्याच्या पोषणाची आणि चांगल्या आहाराची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. तसेच आर्यनची रक्त तपासणीही केली जाणार आहे. आर्यन हा फार लहान वयात तुरुंगात राहिल्याने त्याच्या तब्येतीवर बराच परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण तुरूंगात असताना आर्यनने नीट जेवण घेतले नव्हते. गौरीला देखील अशा स्थितीमध्ये मुलाची त्याच्या आरोग्याची चिंता सतावत आहे. यामुळे पोषणतज्ञांच्या म्हणजे Nutritionists चा सल्ला घेऊन ही विशेष तयारी करण्यात आली आहे. वाचा : 'आपल्या मुलांना सांभाळा' Aryan Khanच्या जामीनावर Piyush Mishra यांची प्रतिक्रिया विशेष म्हणजे शारीरिक तपासणीसोबतच आर्यनच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. आर्यनसाठी विशेष काऊन्सलिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे. यामुळे त्याला यातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. यादरम्यान आर्यनला पार्ट्यांपासून दूर ठेवले जाणार आहे. आज आर्यन खानची तुरूंगातून सुटका क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने (NCB) टाकण्यात आलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आता 26 दिवसांनी आर्यन खान याची आर्थर रोड तुरूंगातून सुटका झाली आहे. गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर आज (30 ऑक्टोबर 2021) आर्यन खानची कारागृहातून सुटका झाली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Shahrukh khan

    पुढील बातम्या