Zero : छोट्या शाहरुखनं या गाण्यात घेतली हवेत झेप, पाहा व्हिडिओ

Zero : छोट्या शाहरुखनं या गाण्यात घेतली हवेत झेप, पाहा व्हिडिओ

झिरो चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. सिनेमातील मेरे नाम तू... या गाण्याबाबतचे अनुभव शेअर करण्यासाठी त्याच एक मेकिंग सध्या व्हायरल होतं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : शाहरुख खानचा येणारा चित्रपट झिरोची सगळीकडे चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताचं लोकांची प्रेक्षकांची पंसती बनला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आत्तापर्यंत 10 कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

झिरो चित्रपटात शाहरुख खानसोबतच अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे कारण चित्रपटात शाहरुख खान छोट्या माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शाहरुखला लहान रूपात पाहून कमल हसनच्या अप्पू राजा सिनेमाची आजही आठवण येते. त्याचबरोबर त्या सिनेमातील गाजलेलं आया है राजा... हे गाणं प्रेक्षकांना आजही पसंत आहे.

अशाच झिरो सिनेमातील गाणीही तितकीच प्रसिद्ध होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सिनेमाचं संगीत मराठमोळे कलाकार अजय-अतुल यांनी दिलं आहे. सध्या याच चित्रपटातील मेरे नाम तू... हे गाणं लोकांना प्रचंड आवडलं आहे.

मेरे नाम तू... या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ नुकताच ट्रोल होत आहे. गाण्याबाबतचे अनुभव अनुष्का आणि शाहरुख सांगताना दिसत आहेत.

अनुष्कानं या गाण्याबाबत सांगताना म्हणाली की, तिच्या आयुष्यातील सगळ्या आवडिचं रोमँटीक साँग आहे. या गाण्यात तिला सोयीचे कपडे घालायला मिळाल्यानं ती फार खूश आहे. रोमँटीक गाणं चित्रित करताना अभिनेत्रीला फार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालावे लागतात. या गाण्यात अनुष्का नाईट सूटमध्ये दिसत आहे.

मेरे नाम तू... या गाण्याच्या शूटिंगला  एकूण 14 दिवस लागले. गाण्याचं नृत्य दिग्दर्शन प्रसिद्ध डान्सर रोमो डिसूझाने केलं असून गाण्यात शाहरुखने लहान मुलांसोबत डान्स केला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुखने ट्विटरद्वारे त्याचा या गाण्या विषयीचा अनुभव शेअर केला आहे अभिनेता शाहरुख या गाण्यात तो गुडघ्यांवर चालला आहे आणि त्याचबरोबर हवेत झेपही घेतली आहे.

First published: December 7, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading