Home /News /entertainment /

30 years of SRK career: शाहरुखला आहे 'ही' सगळ्यात वाईट सवय, अनेकदा खावी लागलीत बोलणी

30 years of SRK career: शाहरुखला आहे 'ही' सगळ्यात वाईट सवय, अनेकदा खावी लागलीत बोलणी

किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) त्याच्या करिअरचा एवढा मोठा टप्पा गाठत आहे. त्याला आज इंडस्ट्रीतून येऊन तीस वर्ष झाली. एका छोट्या गावातून आलेल्या आणि आता बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या एसआरके (SRK) च्या काही सवयींबद्दल तुम्हाला माहित आहे का?

पुढे वाचा ...
  मुंबई 24 जून: बॉलिवूडचा किंग खान (Shahrukh Khan) शाहरुख खानच्या आयुष्यात आज एक खूप मोठा दिवस आहे. किंग खानची बातच काही न्यारी आहे. त्याच्याबद्दल भरभरून बोलणं ही सगळ्यांसाठीच मनातून येणारी भावना आहे. आज किंग खानच्या करिअरची 30 वर्ष पूर्ण (SRk 30 years of career) होत आहेत. याच धर्तीवर जाणून घेऊया त्याच्या स्वभावाबद्दलच्या काही गोष्टी. ऑन स्क्रीन रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसआरकेचा (Shahrukh Khan first movie) पहिला चित्रपट ‘दिवाने’ (Deewane) आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून रोजी 30 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. पहिल्याच सिनेमामधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शाहरुख आपल्या नशिबात असं काहीतरी घेऊन आला आहे ज्याने त्याच्या पहिल्याच फिल्मला आणि पुढच्या सगळ्याच फिल्मना घवघवीत यश दिलं. व स्क्रीन रोमान्स करून प्रेक्षकांना भुरळ पाडणारा शाहरुख खऱ्या आयुष्यात फारच शांत आणि मिश्किल आहे. अनेकदा तो candid गप्पा मारताना, एकदम साधेपणाने बोलताना, विनोद मारताना दिसून येतो. पण शाहरुखला एकच वाईट सवय आहे ज्याबद्दल त्याने इंडस्ट्रीत तीस वर्ष अनेकांची बोलणी ऐकली आहेत. ती सवय म्हणजे उशिरा येण्याची. (Shahrukh Khan punctuality) शाहरुख कधीच कुठल्याच ठिकाणी वेळेवर जात नाही. त्याचं आणि घड्याळाचा छत्तीसचा आकडा आहे. ही सवय आता इंडस्ट्रीत प्रचलित झाली आहे. आणि तीस वर्ष झाली तरी ती सवय अजूनही तशीच आहे. याबद्दल त्याने काही वर्षांपूर्वी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये उल्लेख सुद्धा केला होता. त्याला एका पत्रकाराने उशिरा येण्याबद्दल प्रश्न केला तर तो उपरोधित स्वरात गंमतशीर पद्धतीने बोलताना म्हणाला, “आजकाल मी सगळीकडे लवकर जायचा प्रयत्न करतो. मी लवकर झोपतो, मी धूम्रपान कमी केलं आहे. मी आता सगळीकडे लवकर पोहोचून लोकांना आश्चर्यचकित करणार आहे. कोणीच माझ्या लवकर येण्याची अपेक्षा केली नसेल आता मी प्रत्येक ठिकाणी लवकर जाऊन माझयावर लागलेला हा आरोप खोटा पाडणार आहे. मला तर असं वाटतं की दुनियाच उशिरा चालत आहे मी माझ्या वेळेनुसार लवकरच असतो. मी अनेकदा मानसुकीलाच चॅलेंज केलं आहे पण आता माणुसकीच ऐकत नसेन तर मी सुद्धा वेळेत येऊन दाखवेन. आता मी एवढा वक्तशीर राहेन की माझी भीतीच वाटेल आणि सगळे संकटात येतील.” नुकतंच एका सिनेमॅटोग्राफरने शाहरुखबद्दल fan moment शेअर केली. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तो असं लिहितो की, “शाहरुख खान! किंग खानसोबत माझं फिल्म ऍड फिल्मच शूट. शाहरुख आदल्यादिवशी एका फिल्मचं शूटिंग करत असल्याने तो उशिरा सेटवर आला. हे ही वाचा- लग्न होऊनही 'या' प्रसिद्ध कलाकारांना दुसऱ्या अभिनेत्रींवर जडलं होतं प्रेम! पण त्याने अत्यंत अदबीने आणि मनमोकळेपणाने सगळ्यांची माफी मागितली. तो खूप प्रोफेशनली काम करत होता तरीही मधेच एखादा विनोद करून हास्याचे स्फोट सुद्धा करत होता. त्याच्यासाठी stand in नसल्याने तो मार्क करून दिलेल्या जागी बसला होता आणि माझं लायटिंग होईपर्यंत वाक्यांची तालीम करत होता. त्याला सगळ्या तंत्रज्ञांची नाव माहित होती आणि तो त्यांना नावानेच हाक मारत होता.
  तो सेटवर असेपर्यंत एकही क्षण ढेपाळलेला गेला नाही. शूटिंग संपल्यावर त्याने प्रेमाने हस्तांदोलन केलं. आणि फोटोसुद्धा काढले. केवढा प्रेमळ आणि साधा माणूस!” शाहरुखने आजपर्यंत अनेक ब्लॉकबस्टर हिट्स दिले आहेत. 2023 मध्ये अखेर तो कमबॅक करत आहे. तो अख्ख वर्ष गाजवणार असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actor, Shahrukh khan

  पुढील बातम्या