Home /News /entertainment /

Breaking: Aryan Khanच्या अडचणीत वाढ; शाहरुखचा मुलगा कुठून ड्रग्स घ्यायचा NCB ने केला मोठा खुलासा

Breaking: Aryan Khanच्या अडचणीत वाढ; शाहरुखचा मुलगा कुठून ड्रग्स घ्यायचा NCB ने केला मोठा खुलासा

हे प्रकरण बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांशी संबंधित आहे.

    मुंबई, 13ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan Son ) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drug Case)ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचे अधिकारक्षेत्र नसल्याचे कारण देत त्यांची याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात झाले होते. त्यांनतर यावर आज १३ ऑक्टोबर दिवशी सुनावणी सुरु आहे. दरम्यान आज NCB ने खुलासा करत सांगितलं आहे, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा आपला मित्र आणि या प्रकरणातील आणखी एक आरोपी असणारा अरबाजकडून कॉन्ट्राबँड खरेदी करत असे. तसेच आर्यन खान औषधांच्या बेकायदेशीर खरेदीसाठी 'आंतरराष्ट्रीय औषध नेटवर्क'चा भाग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा दावा NCB ने केला आहे.तसेच आरोपी क्रमांक १७ अचित कुमार आणि क्रमांक १९ शिवराज हरिजन आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाजला ड्रग्स पुरवत असल्याचंही NCB ने म्हटलं आहे. आर्यन खान आणि अरबाज हे नेहमीच एकमेकांसोबत असत त्यामुळे दोघांचाही यात हात असणार म्हणत दोघेही NDPS च्या कलम २९ लागू करण्यास पात्र असल्याचं म्हटलं आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयात आपले उत्तर दाखल केल आहे. . त्यानुसार न्यायालायात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांशी संबंधित आहे. ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका हायप्रोफाई क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीत NCBने छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतलं होतं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दावा केला होता. की क्रूझ शिपमधील काही व्यक्तींकडून प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत, ज्याने "आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग" नेटवर्कचा इशारा दिला आहे ज्याची चौकशी करणे आवश्यक आहे. एनडीपीएस न्यायालयाने सोमवारी एनसीबीला आदेश जारी केले होते आणि त्यानुसार 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाबाबत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Shahrukh khan

    पुढील बातम्या