S M L

'पद्मावत'च्या विरोधावेळी का गप्प बसला शाहरुख?

आम्ही या वादात शांत राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण अभिनेता शाहरूख खान याने दिले. तो मंगळवारी मॅजेस्टिक महाराष्ट्रमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होता.

Sonali Deshpande | Updated On: Feb 21, 2018 12:55 PM IST

'पद्मावत'च्या विरोधावेळी का गप्प बसला शाहरुख?

21 फेब्रुवारी :  'पद्मावत' चित्रपटाला विरोध होत असताना बॉलिवूड इंडस्ट्री कोणाच्या भीतीमुळे किंवा घाबरल्यामुळे गप्प बसली नव्हती. केवळ आमच्या प्रतिक्रियांमुळे विरोधकांना आणखी प्रसिद्धी मिळून 'पद्मावत'ला बॉक्स ऑफिसवर फटका बसू नये, असे आम्हाला वाटत होते. त्यामुळेच आम्ही या वादात शांत राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण अभिनेता शाहरूख खान याने दिले. तो मंगळवारी मॅजेस्टिक महाराष्ट्रमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होता.

अडचणीच्या वेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार एकटवत नाहीत, हा गैरसमज आहे. काही वेळा तुमच्या विरोधकांचा आवाज वाढला असेल तेव्हा शांत राहणेच श्रेयस्कर असते. विरोधाला घाबरून बॉलिवूड कलाकारांनी स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे साफ चुकीचे आहे.

बॉलिवूड कलाकारांना केवळ पैसे कमवायचे असतात, समाजाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते, असेही बोलले जाते. परंतु, तसे नाही. आमचेही समाजावर प्रेम आहे. आम्ही लोकांचे मनोरंजन करणारे चित्रपट तयार करतो, जेणेकरून लोक आनंदात राहतील, असे शाहरूखने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 12:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close