आमिरच्या आधी शाहरूखनं केलं सचिनच्या सिनेमाचं प्रमोशन

आमिरच्या आधी शाहरूखनं केलं सचिनच्या सिनेमाचं प्रमोशन

सचिन तेंडुलकरच्या 'अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचं प्रमोशन शाहरूख खाननं केलं.

  • Share this:

20 एप्रिल : सचिन तेंडुलकरच्या 'अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचं प्रमोशन शाहरूख खाननं केलं. शाहरूखनं ट्विट केलंय. तो म्हणतो, ' जेव्हा सचिननं आपल्या करियरमध्ये चांगलं करत होता, तेव्हा शाहरूखही करत होता. सचिन चालला नाही, तेव्हा शाहरूखही फेल झालाय.'

यावर मग सचिन कसा गप्प बसेल? त्यानंही ट्विट करून म्हटलंय, आयुष्यात हार नसती तर कुणी जिंकला नसता आणि काही शिकलाही नसता.

शाहरूख सचिनला आपला आयकाॅन मानतो. शाहरूख आयपीएलच्या टीमचा मालक आहे. सचिन त्याच्या टीममध्ये कधी खेळलाही नाही. तरीही किंग खाननं सचिनच्या सिनेमाचं प्रमोशन केलं.

याउलट आमिर खानच्या थ्री इडियट्सच्या वेळी सचिन तेंडुलकरनं प्रमोशन केलं होतं. 'सत्यमेव जयते'चंसाठीही आमिरनं सचिनचा उपयोग केला होता. पण आता आमिर खान गप्प आहे.

सचिनच्या सिनेमाचं ट्रेलर लाँच झाल्यावर अनेक स्टार्सनी त्याचं अभिनंदन केलं. पण सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती आमिर खानची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 12:43 PM IST

ताज्या बातम्या