बाॅलिवूडच्या सर्वात रोमँटिक जोडीनं दिल्या विरुष्काला शुभेच्छा!

बाॅलिवूडच्या सर्वात रोमँटिक जोडीनं दिल्या विरुष्काला शुभेच्छा!

सध्याची सर्वात रोमँटिक जोडी म्हणून दोघांकडे पाहिलं जातंय. पण या जोडीला बाॅलिवूडच्या रोमँटिक जोडीनं मनापासून शुभेच्छा दिल्यात.

  • Share this:

12 डिसेंबर: सध्या ट्रेंडिंग एकच गोष्ट आहे. ती म्हणजे विराट आणि अनुष्काचं लग्न. लग्न इटलीला झालं तरी अख्खा भारतदेशच जणू वऱ्हाडी झालाय. इटलीमधल्या वाजंत्रीचा आवाज सगळीकडेच घुमतोय.  सध्याची सर्वात रोमँटिक जोडी म्हणून दोघांकडे पाहिलं जातंय. पण या जोडीला बाॅलिवूडच्या रोमँटिक जोडीनं मनापासून शुभेच्छा दिल्यात.

ही रोमँटिक जोडी कोण हे ओळखलंच असाल तुम्ही. शाहरूख खान आणि काजोल. दोघांनीही या जोडीला ट्विट करून शुभेच्छा दिल्यात.

काजोलनं म्हटलंय, 'बेस्ट आॅफ लक विराट आणि अनुष्का. पण तुमचं काॅम्बो नाव विरुष्कापेक्षा विराट आणि अनुष्काचं चांगलं आहे. पण आयुष्यात तुमचं हे काॅम्बिनेशन यशस्वी राहो.

शाहरूखनंही छान ट्विट केलं. तो म्हणतोय, ' ही झाली ना खरीखुरी रब ने बना दी जोडी. दोघांनाही खूप खूप प्रेम.'

दोघांच्या लग्नानं क्रिकेट जगत आणि बाॅलिवूड सगळेच खूश आहेत.

First published: December 12, 2017, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading