Home /News /entertainment /

Bigg Boss 15: सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिलला अश्रू अनावर; दबंग खानही झाला भावूक VIDEO

Bigg Boss 15: सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिलला अश्रू अनावर; दबंग खानही झाला भावूक VIDEO

सलमानला भेटताच ती भावूक झाली आणि मिठी मारून रडू लागली. त्याचवेळी सलमानलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  मुंबई, 29 जानेवारी : 'बिग बॉस 15'च्या प्रेक्षकांसाठी शनिवार-रविवार खूप खास असणार आहे. बिग बॉस 15 चा विजेता रविवारी प्रेक्षकांसमोर येणार आहे. यावेळी शोचा ग्रँड फिनाले खास बनवण्यासाठी सर्व जुने विजेते सहभागी होतील. ग्रँड फिनालेशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच शहनाज गिलही या शोला खास बनवण्यासाठी पोहोचली आणि सलमान खानला पाहून भावूक झाली. सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत सलमान आणि शहनाज गिल यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, रश्मी देसाई आणि प्रतीक सहजपाल हे विजेत्यांच्या रेसमध्ये आहेत. सलमान-शहनाज झाले भावूक नुकताच कलर्सने बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला शहनाज गिल दिवंगत अभिनेता आणि तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे आणि त्यानंतर ती सलमानला भेटते. सलमानला भेटताच ती भावूक झाली आणि मिठी मारून रडू लागली. त्याचवेळी सलमानलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहतेही सिद्धार्थची आठवण काढत कमेंट करत आहेत. हे वाचा - ‘Bigg Boss 15’ च्या घरातून बाहेर पडताच रुग्णालयात दाखल झाली देवोलिना, नेमकं काय घडलं बिग बॉस 15 ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले दोन भागात प्रसारित केला जाईल. पहिला भाग 29 जानेवारी 2022 (शनिवार) रोजी रात्री 8 वाजता प्रसारित केला जाईल. दुसरा भाग 30 जानेवारी 2022 (रविवार) रोजी प्रसारित केला जाईल. कलर्स टीव्हीवर प्रेक्षक बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले पाहू शकतात. याशिवाय, शेवटचा भाग संध्याकाळी 7:30 वाजता VOOT अॅपवर थेट पाहता येईल.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेसाठी खास पाहुणे बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये, 'गेहराईं' स्टार्स दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी सलमान खानसोबत स्टेजवर पाहुणे म्हणून दिसणार आहेत. ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. यासोबतच, बिग बॉस 15 चा फिनाले देखील सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांसाठी खास असेल, कारण त्याची जवळची मैत्रीण शहनाज गिल बिग बॉस 13 च्या दिवंगत विजेत्याला श्रद्धांजली वाहणार आहे. यादरम्यान शहनाजसोबत, बीबीची माजी विजेती श्वेता तिवारी, गौहर खान, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकिया देखील कार्यक्रमात सामील होतील आणि आदरांजली वाहतील. त्यामुळे शेवटचा भाग सर्वांसाठी खूप खास असणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bigg boss, Salman khan

  पुढील बातम्या