मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shehnaaz Gill: सिद्धार्थ शुक्लानंतर पुन्हा प्रेमात पडली शहनाज गिल ? 'या' कोरिओग्राफरला करतेय डेट

Shehnaaz Gill: सिद्धार्थ शुक्लानंतर पुन्हा प्रेमात पडली शहनाज गिल ? 'या' कोरिओग्राफरला करतेय डेट

  'बिग बॉस' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोपैकी एक आहे. या शोमुळे अनेक कलाकरांना नवी ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल होय.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 17 ऑगस्ट-  'बिग बॉस' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोपैकी एक आहे. या शोमुळे अनेक कलाकरांना नवी ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल होय. शहनाजला पंजाबची कतरिना कैफदेखील म्हटलं जातं. ही अभिनेत्री सिद्धार्थ शुक्लासोबतच नात्यामुळेदेखील प्रचंड चर्चेत आली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला मोठा धक्का बसला होता. आता अभिनेत्रीने स्वतः ला यातून सावरलं आहे. असं म्हटलं जात आहे की, शहनाज पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता आणि कोरियोग्राफरसोबत तिचं नाव जोडलं जात आहे. 'बिग बॉस 13' मधून शहनाज गिल घराघरात पोहोचली होती. आपल्या सरळसाध्या स्वभावाने अभिनेत्रीनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. बिग बॉसच्या घरात शहनाज आणि दिवंगत अभिनेता शहनाज यांच्या नात्याची प्रचंड चरचा झाली होती. या शोनंतरसुद्धा शहनाज आणि सिद्धार्थ एकत्र होते. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. परंतु अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वच हादरले होते. त्यामुळे जेव्हा शहनाजचं नाव येतं तेव्हा आपसूकच त्याठिकाणी सिद्धार्थचं देखील नाव येतं. पण आ शहनाज आपल्या आयुष्यात पुढे जाताना दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शहनाज गिल आणि प्रसिद्ध कोरियोग्राफर- अभिनेता राघव जुयाल यांच्यामध्ये जवळीकता वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघेही सध्या सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात म्हत्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या सेटवर हे दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच शहनाज आणि राघव एकमेकांना पसंतदेखील करत असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती राघव किंवा शहनाजने दिलेली नाहीय. त्यामुळे त्यांच्यामध्ये नक्की काय शिजतंय हे येणाऱ्या काळात समजेलचं. (हे वाचा:Ankita Lokhande: अंकिता लोखंडेकडेसुद्धा आहे Good News? लेटेस्ट फोटोमध्ये दिसला बेबी बम्प ) तत्पूर्वी बॉलिवूड लाईफने दिलेल्या रिपोर्टनुसार, शहनाज गिल आणि राघव जुयाल एकत्र बाहेर ट्रिपवर गेले होते. या रिपोर्टनुसार दोघांनी नुकतंच हृषिकेशची यात्रा केली आहे. या दोघांना एयरपोर्टवर एकत्र पाहण्यात आल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान राघव आणि शहनाजने एकाच लोकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो त्यांनी वेवेगळ्या वेळेला शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
First published:

Tags: Actress, Entertainment

पुढील बातम्या