मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shehnaaz Gill: सलमानच्या चित्रपटातून एक्झिट? शहनाज गिलने अखेर सोडलं मौन, सांगितलं सत्य

Shehnaaz Gill: सलमानच्या चित्रपटातून एक्झिट? शहनाज गिलने अखेर सोडलं मौन, सांगितलं सत्य

शहनाज गिल सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातसुद्धा झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर शहनाजला चित्रपटातून काढल्याच्या अफवा समोर आल्या. या सगळ्या रंगलेल्या चर्चांवर अखेर शहनाज गिलनं मौन सोडलं आहे.

    मुंबई, 9 ऑगस्ट : 'बिग बॉस'मुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाझ गिल (Shehnaaz Gill). 'बिग बॅस 13' मुळे शहनाज चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे तेव्हापासून तिची लोकप्रियता वाढतच चालल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहनाज सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शहनाज गिल सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातसुद्धा झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर शहनाजला चित्रपटातून काढल्याच्या अफवा समोर आल्या. या सगळ्या रंगलेल्या चर्चांवर अखेर शहनाज गिलनं मौन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत तिनं या सगळ्या रंगलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिलीये. शहनाज गिलनं तिच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर स्टोरी शेअर करत चित्रपटाविषयी आणि तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी रंगलेल्या चर्चांवर अखेर मौन सोडलंय. शहनाजनं म्हटलं की, 'LOL गेल्या काही आठवड्यांपासून येणाऱ्या अफवा माझ्या दिवसांच्या मनोरंजाचं साधन झालं आहे. या अफवांमुळे माझी रोजची करमणूक होत आहे. मीही आता वाट पाहू शकत नाही की, लोक चित्रपट पाहतील आणि त्या चित्रपटात मी स्वतःही असेल'. शहनाजनं शेअर केलेली ही स्टोरी सध्या तुफान व्हायरल होत आहे. यावरुन दिसतंय की, चित्रपटाच्या आणि चित्रपटातून तिला काढल्याच्या सगळ्या अफवा आहेत. शहनाज आणि सलमानच्या चित्रपटाविषयी सुरु असलेल्या या अफवांवर अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की काय विषय आहे हे चाहत्यांना समजत नाहीये. चाहतेही आता संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे याविषयी अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. हेही वाचा -  Mahesh Babu Birthday : आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या; पाहा सुपरस्टार महेश बाबूची थक्क करणारी संपत्ती दरम्यान, 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Big boss, Bollywood News, Salman khan, Upcoming movie

    पुढील बातम्या