मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OMG! शाहीरने LEAK केलं सीक्रेट; अंकिता लोखंडे लवकरच विकीसोबत करणार लग्न

OMG! शाहीरने LEAK केलं सीक्रेट; अंकिता लोखंडे लवकरच विकीसोबत करणार लग्न

अंकिता लोखंडे सतत सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते

अंकिता लोखंडे सतत सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते

अंकिता लोखंडे सतत सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते

 मुंबई, १० सप्टेंबर- 'पवित्र रिश्ता २' (Pavitra Rishta 2) ची चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. सतत सेटवरील व्हिडीओ आणि फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच सोशल मीडियावर सतत अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या भागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची जागा घेतलेला अभिनेता शाहीर शेख (Shahir Shekh) यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. नुकताच शाहीरने एका मुलखती दरम्यान अंकिता लोखंडेचं मोठं सिक्रेट लिक केलं आहे.

'पवित्र रिश्ता २'च्या निमित्ताने अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता शाहीर शेखने बॉलिवूड हंगामाला एक मुलाखत दिली आहे. यावेळी अंकिताला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी अंकिताने सध्या आपला लग्नाचा कोणताच प्लॅन नसल्याचं सांगितलं. मात्र शाहीरने अंकिताला चिडवत 'कम ऑन तू लग्न करत आहेस' असं म्हणत सर्वांनाचं हिंट दिली आहे.

(हे वाचा:स्वप्नील जोशी ते वीणा जगताप या कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन)

यावेळी अंकिताने शाहीरला गप्प करत आपला सध्या लग्नाचा कोणताच प्लॅन नसल्याचं म्हटलं. मात्र आपण फेब्रुवारीपासून काहीतरी नवीन करणार असल्याचं म्हटलं आहे. याआधी मी महिन्यात अंकिताने आपण विकिशी लग्न करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. अंकिता लोखंडे गेल्या ३ वर्षांपासून विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनी नुकताच वाढदिवस साजरा केला होता.

(हे वाचा:राज आधी या बिग बॉस फेम अभिनेत्याच्या प्रेमात होती मुनमुन दत्ता, विवादित ठरलेलं..)

अंकिता लोखंडे सतत सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. हे दोघे अनेकवेळा एकत्र सुट्टीचा आनंद घेताना दिसून येतात. तसेच अंकिता विक्कीसाठी खास पोस्टसुद्धा लिहून इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. अंकिता लवकरच 'पवित्र रिश्ता २'च्या माध्यमातून आपल्याला भेटायला येणार आहे. मात्र चाहत्यांना अजूनही सुशांतची आठवण येत असते. चाहते अजूनही सुशांत आणि अंकिताच्या जोडीची आठवण काढत असतात.

First published:
top videos

    Tags: Ankita lokhande, Entertainment