शाहीद कपूर थांबवणार भारतातली वीजचोरी

हा एक कॉमेडी सिनेमा असून शाहीदने सिनेमा साईन केला असल्याच्याही चर्चा रंगतायत. जर या साऱ्या चर्चांमध्ये तथ्य असेल तर शाहीद वकिलाच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणारे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 07:11 PM IST

शाहीद कपूर थांबवणार भारतातली वीजचोरी

18 सप्टेंबर : 'पद्ममावती' सिनेमानंतर अभिनेता शाहीद कपूर आता भारतात होणारी वीजचोरी बंद करणार आहे. पडलात ना विचारात?  त्याचं काय आहे, दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांच्या 'रोशनी' सिनेमाच्या तयारीला लागणार असल्याच्या चर्चा आहेत. या सिनेमात शाहीद एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय.हा सिनेमा भारतात होणाऱ्या वीजचोरीच्या समस्येवर आधारित अाहे.

हा एक कॉमेडी सिनेमा असून शाहीदने सिनेमा साईन केला असल्याच्याही चर्चा रंगतायत. जर या साऱ्या चर्चांमध्ये तथ्य असेल तर शाहीद वकिलाच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणारे.

हल्ली सामाजिक विषयांवरच्या सिनेमांची चलती आहे. नुकताच रिलीज झालेला अक्षय कुमारचा 'टाॅयलेट एक प्रेमकथा' तुफान चालला. त्यामुळे रोशनीबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...