मुंबई, 9 मार्च- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) बहीण अर्थातच पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी सना कपूरचं (Sana Kapoor) नुकतंच लग्न झालं आहे. बहिणीच्या लग्नात शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत सहभागी झाला होता. सना एका प्रसिद्ध अभिनेत्याची सून बनली आहे. सनाचं लग्न सीमा पाहवा आणि मनोज पाहवा यांचा मुलगा मयंकसोबत झालं आहे. लग्नानंतरचे सर्व विधी पार पाडल्यानंतर सनाच्या सासरच्यांनी कपूर कुटुंबाला त्यांच्या घरी मेजवानीसाठी बोलावलं होतं. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सना कपूरची सासु म्हणजेच अभिनेत्री सीमा पाहवा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये वधू-वराच्या कुटुंबात किती छान बॉन्डिंग आहे हे दिसून येत आहे. शाहिद कपूर, मीरा राजपूत, पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांनी डिनर पार्टीमध्ये खूप एन्जॉय केल्याचं दिसत आहे. या सुंदर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सीमा, मनोज, मयंक, सना, सुप्रिया, पंकज एकत्र दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये सना, मयंक, मीरा-शाहिद दिसत आहेत.
शाहिद कपूर आणि सना कपूर ही सावत्र भावंडं असली तरी त्यांचं बालपण एकत्र गेलं आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यात खूप प्रेम आहे. दुसरीकडे, मीरा राजपूतलादेखील हे कौटुंबिक संबंध कसे जपायचे हे माहित आहे. मीरा राजपूत पीच कलरच्या प्रिंटेड साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. तर सना कपूर पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये क्यूट दिसत आहे. हे फोटो शेअर करत सीमा पाहवाने 'Friends Forever' असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.
View this post on Instagram
सना कपूर आणि मयंक पाहवा यांचे डेस्टिनेशन वेडिंग महाबळेश्वरमध्ये पार पडले. यादरम्यान शाहिदची पत्नी मीरा राजपूत पांढऱ्या आयव्हरी वर्कच्या लेहेंग्यात नेहमीसारखीच सुंदर दिसत होती.मीडिया रिपोर्टनुसार, डिझायनर रितिका मीरचंदानीने डिझाईन केलेल्या या लेहेंग्याची किंमत सुमारे दीड लाख होती. सनाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. शाहिद हा पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम यांचा मुलगा आहे. तर सना ही पंकज आणि त्यांची दुसरी पत्नी सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. सुप्रिया या प्रसिद्ध अभिनेत्री दीना पाठक यांची लेक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.