मुंबई,8 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या (Mrunal Thakur) अपकमिंग 'जर्सी' चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे. यामध्ये दोघांच्या लव्ह लाईफ पासून ते लग्नापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यामध्ये पंकज कपूरसुद्धा आनंदाने नाचताना दिसून येत आहेत. गाणं ऐकायला फारच छान वाटत आहे.
शाहिद कपूरच्या या नव्या गाण्याचं टायटल आहे, ;मैय्या मैनू'. हे गाणं गायक सचेत टंडनने गायलं आहे. तर सचेत आणि परंपराने याला म्युझिक दिलं आहे. तसेच हे गाणं प्रसिद्ध गीतकार शेलीने लिहिलं आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. शाहिद कपूरने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 'मैय्या मैनू .... आमचं लिरिकल लव्हलेटर आऊट... तर दुसरीकडे चित्रपटाची अभिनेत्री मृणाल ठाकूरने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 'विद्या, समोसा आणि प्रेम जे प्रत्येक क्षणाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं... मैय्या मैनू प्रदर्शित झालं आहे'.
शाहिद कपूरचे चाहते त्याच्या आगामी 'जर्सी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. शाहिदसोबतच त्याचे वडील पंकज कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात विशेष भूमिका साकारत आहेत. जर्सी 31 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याआधी या चित्रपटातील 'मेहरम' हे एक गाणं रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं लोकांना फार आवडलं होतं. 'मेहरम' गाण्याची सुरुवात संवादाने होते. यामध्ये असा संवाद ऐकायला मिळतो कि 'तरुणांना संधी दिली तर त्यांचे करिअर घडेल. त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.
'मेहरम' हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं होतं. चाहते कमेंट करून गाण्यावरचं प्रेम व्यक्त करत आहेत. 'जर्सी' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना शाहिदच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळाली आहे. सर्वत्र त्याच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. गायक सचेत टंडनने पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. चाहते या गाण्याबद्दल भावुक कमेंट्स करत आहेत. दुसऱ्या एका चाहत्याने शाहिदचे कौतुक करत म्हटलं आहे, 'आधी 'कबीर सिंग' आणि आता 'जर्सी'. मला माहित आहे की हे दोन्ही चित्रपटांचे रिमेक आहेत. परंतु शाहिद कपूरने दोन्ही चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे. 'हैदर', 'कमिने'मध्येही त्याने आपला सर्वोत्कृष्ट अभिनय दाखवला होता.मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही. आता तब्बल 2 वर्षानंतर त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shahid kapoor