मुंबई, 3 फेब्रुवारी- मनोरंजनसृष्टीत सध्या लग्न सोहळ्यांचा (Wedding Season) धुमधडाका सुरु आहे. बॉलिवूड (Bollywood) असो किंवा छोटा पडदा एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्याबेडीत अडकत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कतरिना-विकी, अंकिता-विकी,मौनी-सुरज यांनी लग्नाचा बार उडवून दिला. नुकतंच अभिनेता विक्रांत मेसीने अभिनेत्री शीतल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनतर फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली. या यादीत आता शाहिद कपूरची बहीण (Shahid Kapoor Sister) सना कपूरचा (Sana Kapoor Wedding) सुद्धा समावेश झाला आहे. काल सनाचा लग्नसोहळा पार पडला.
सना कपूर आपला बॉयफ्रेंड मयंक पाहवासोबत लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी मोठ्या उत्साहात परंतु मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला. आत्ता सनाच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. परंतु सर्वप्रथम वहिनी मीरा आणि भाऊ शाहिद कपूरने बहिणीसोबतचा खास फोटो शेअर करत तिला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेता शाहिद कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बहिणीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. आणि माझी छोटीशी बिट्टू आज नवरी बनली आहे. सर्वजण किती लवकर मोठे झाले. या नवीन आणि अद्भुत अध्यायाची ही भावुक सुरुवात आहे. तुला आणि मयंकला नेहमीच प्रकाशमय आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा'. असं म्हणत शाहिद कपूरने आपल्या लाडक्या बहिणी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून एका भावाचं प्रेम, बहिणीकडे असलेली ओढ आणि बालपणीच्या आठवणीं सर्वकाही स्पष्टपणे दिसून येत आहे.
(हे वाचा:हृतिक रोशन ते श्रद्धा कपूर 'या' बॉलिवूड कलाकारांची निकनेम आहेत फारच मजेशीर )
यासोबतच शाहिद कपूरची पत्नी आणि सना कपूरची वाहिनी मीरा राजपूतनेसुद्धा भावनिक पोस्ट लिहीत सना आणि मयंकला शुभेच्छा दिल्या होत्या. सना आणि मयंकचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. त्यांनतर काल हे दोघे विवाहबंधनात अडकले. सना कपूर ही पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. तर मयंक हा अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. या दोन्ही कुटुंबात जुनी मैत्री आहे. सना कपूरसुद्धा एक अभिनेत्री आहे. सनाने शाहिद कपूर आणि आलिया भट्टच्या 'शानदार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.परंतु तिचं करिअर म्हणावं तितकं यशस्वी राहिलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Shahid kapoor