मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पत्नी मीरा राजपूतने व्यक्त केली ही इच्छा : शाहिदने सोशल मीडियावर मागितली मदत

पत्नी मीरा राजपूतने व्यक्त केली ही इच्छा : शाहिदने सोशल मीडियावर मागितली मदत

'माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे. कारण मी मसाला चित्रपट करत नाही,' शाहिद कपूरने (Shahid Kapur) असा मेसेज लिहून बायकोविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ती भलतीच व्हायरल झाली आहे.

'माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे. कारण मी मसाला चित्रपट करत नाही,' शाहिद कपूरने (Shahid Kapur) असा मेसेज लिहून बायकोविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ती भलतीच व्हायरल झाली आहे.

'माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे. कारण मी मसाला चित्रपट करत नाही,' शाहिद कपूरने (Shahid Kapur) असा मेसेज लिहून बायकोविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ती भलतीच व्हायरल झाली आहे.

    मुंबई, 11 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा(Shahid Kapoor) 'कबीर सिंग'(Kabir Singh) सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता त्याचा नवीन 'जर्सी'(Jersey) हा सिनेमा येत असून यामध्ये तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. साऊथच्या सिनेमाचा हा सिनेमा रिमेक असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील सिनेमा सुपरहिट ठरल्याने या सिनेमाकडून देखील त्याला खूप अपेक्षा आहेत. परंतु  त्याच्या पत्नीवर फारसा काही फरक झालेला दिसत नाही. मीरा राजपूत (Meera Rajput) हिने शाहिदला वेगळ्या धाटणीच्या सिनेमात पाहण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

    शाहिद कपूर (Shahid Kapoor) याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर(Instagram) एक मजेशीर स्टेटस ठेवलं होतं. यामध्ये शाहिदने त्याला आता असा सिनेमा द्यावा ज्यात तो खूप मजा- मस्ती करू शकेल आणि दिलखुलास नाचू शकेल. शाहिदने या इन्स्टा मेसेजमध्ये असंही लिहिली कि,  'माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे. कारण मी मसाला चित्रपट करत नाही ज्यामध्ये मी मनमुरादपणे नाचू शकतो. त्यामुळे आता मी विनंती करतो की माझा अशा सिनेमांसाठी विचार करावा ज्यात मी मनोसोक्तपणे नाचू शकतो आणि मी मीराला खूश करू शकतो.' यावर शाहिदची पत्नी मीरा हिनेदेखील या स्टेटसवर 'अविश्वसनीय' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    याचबरोबर शाहिद कपूर याने आपल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये आपल्या आगामी जर्सी(Jersey) या सिनेमाच्या टीमचे आणि क्रू मेम्बरचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये त्याने कोरोनामुळे आपल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला 47 दिवस लागल्याचे म्हटले आहे. ज्या पद्धतीने फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा झेप घेतो त्याच पद्धतीने आमच्या टीमने काम केल्याचं देखील या मेसेजमध्ये शाहिद कपूर याने म्हटले आहे.

    दरम्यान, शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या सिनेमात शाहिद कपूर याच्याबरोबर मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा गौतम टिंनानुरी ( Gowtam Tinnanuri) यांनी दिग्दर्शित केला आहे. याचबरोबर आगामी काळात शाहिद कपूर योद्धा (Yoddha) आणि फर्जी (Farzee) या दोन सिनेमांमध्ये देखील दिसणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood, Shahid Kapoor-Mira Rajput