मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'कॉफी हवी का कॉफी', हातात कप घेऊन ओरडत का फिरतोय शाहीद कपूर? VIDEO VIRAL

'कॉफी हवी का कॉफी', हातात कप घेऊन ओरडत का फिरतोय शाहीद कपूर? VIDEO VIRAL

शाहीद कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मात्र कबीर सिंगची आठवण झाली आहे.

शाहीद कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मात्र कबीर सिंगची आठवण झाली आहे.

शाहीद कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मात्र कबीर सिंगची आठवण झाली आहे.

मुंबई, 31 मार्च- बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) च्या कॉफी प्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती असेल. शाहीद कुठेही असला तरी त्याच्या हातात कॉफीचा कप ठरलेला असतो. मग तो शूटिंगच्या सेटवर असो किंवा बाहेर कुठेही तो कॉफी पितानाच दिसतो. दिवसात किमान तो आठ ते दहा वेळा कॉफी घेतो. आता त्याच्याप्रमाणेच इतरांनीही कॉफी प्रेमी व्हावं, अशी शाहीदची इच्छा (Shahid Kapoor Latest Video) दिसत आहे.

शाहीद कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो दुसऱ्याला कॉफी घेणार का ? असं विचारताना दिसत आहे. व्हिडिओत शाहीदचं कॉफी प्रेम वेगळ्याच टप्प्यावर पोहचल्याचं दिसत आहे. कारण तो 'लनुना कॅफे'च्या ट्रेडिंग रीलवर लिप सिंक करत आहे. शाहीदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  विशेष म्हणजे त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मात्र कबीर  सिंगटी आठवण झाली आहे.

वाचा-'सेंटरमध्ये ज्या वाघीणीनं पंजा काढलाय ती..' अभिनेत्रीच्या चॅलेंजला फॅन्सचं उत्तर

व्हिडिओच्या सुरुवातच शाहीदपासून होत आहे. तो व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॉफीचा मग घेऊन दिसत आहे. आपल्या क्रू मेंबर्सना तो जोर-जोरात विचारतोय की, "मी कॉफी बनवत आहे, कुणाला कॉफी पाहिजे का?" शाहीद जेव्हा ओरडून विचारतो की कुणाला कॉफी पाहिजे का?, तेव्हा सगळे क्रू मेंबर्स घाबरून व्हॅनिटी व्हॅनच्या कोपऱ्यात येऊन उभे राहतात.

वाचा-Live Video दरम्यान पती मेहुलचा विषय निघताच अभिज्ञा भावे झाली भावुक

पुढे शाहीद आपल्या गाडीचा दरवाजा उघडतो आणि सहकाऱ्यांना पुन्हा म्हणतो की, "मी एक कप कॉफी पित आहे, कुणाला पाहिजे का ?" त्यानंतर शाहीद सहकाऱ्यांसोबत चालताना दिसतो आणि पुन्हा ओरडत विचारतो की, "कुणाला कॉफी पाहिजे का, मी कॉफी पित आहे."

दरम्यान, व्हिडिओत शाहीदने मॅचिंग एंकल लेंथ पँटसोबत ब्राउन शर्ट परिधान केला आहे. तर ब्लॅक फॉर्मल शूज आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये तो हँडसम दिसत आहे. शाहीद नेटकऱ्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनीही यावर 'मला कॉफी पाहिजे, कॉफी विथ करण शो मध्ये जा, यात तर कबीर सिंग दिसतोय,' अशा कमेंट केल्या आहेत. शाहीद लवकरच नव्या फिल्मसह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 14 एप्रिलला त्याचा जर्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shahid kapoor