Kabir Singh नंतर शाहिदनं वाढवलं मानधन, मागितले तब्बल इतके कोटी

Kabir Singh नंतर शाहिदनं वाढवलं मानधन, मागितले तब्बल इतके कोटी

Kabir Singh च्या प्रमोशन दरम्यान शाहिदनं त्याच्याकडे इतर कोणताही सिनेमा नसल्याचं आणि त्याला काम मिळत नसल्याचं म्हटलं होतं.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा सिनेमा कबीर सिंगमुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं आणि या सिनेमानं 2 आठवड्यातच 200 कोटींचा पल्ला पार केला. या सिनेमाच्या यशाचा फायदा अर्थातच शाहिद कपूरलाही झाला आहे. या सिनेमानंतर शाहिदनं त्याचं मानधन वाढवल्याचं बोललं जात आहे. पण आता शाहिद यानंतरच्या सिनेमांसाठी किती मानधन घेणार याचाही खुलासा झाला आहे.

कबीर सिंगच्या प्रमोशन दरम्यान शाहिदनं त्याच्याकडे इतर कोणताही सिनेमा नसल्याचं आणि त्याला काम मिळत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र या सिनेमाच्या यशानंतर सर्व गणितं बदलली आणि शाहिद मार्केट व्हॅल्यू वाढली. त्यामुळे शाहिदनं सुद्धा त्याच्या मानधनात वाढ केली असून यानंतरच्या सिनेमांसाठी तो तब्बल 35 कोटींचं मानधन घेणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शाहिदनं मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण हे वृत्त खरं असल्यास शाहिद बॉलिवूड मधल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत जाऊन बसेल. ‘कबीर सिंग’नं शाहिदच्या सिने करिअरला अचानकपणे कलाटणी मिळाली आहे. शाहिद कपूर व्यतिरिक्त अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान इत्यादी अभिनेतेही या सर्वाधिक मनधन घेणाऱ्याच्या यादीत टॉपला आहेत.

‘बाहुबली’मधील 1 हजार फुटांच्या धबधब्याचा सीन पाण्याशिवायच झाला होता शूट

 

View this post on Instagram

 

#kabirsingh 15 days to go.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

कबीर सिंगच्या यशानंतर शाहिदनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. त्यानं लिहिलं, ‘तुमच्या सर्वांच्या प्रेमापुढे माझे शब्द कमी पडतील. धन्यवाद. माझी भूमिका समजून घेतल्याबद्दल, त्या भूमिकेला माफ केल्याबद्दल, त्या भूमिकेला एवढं प्रेम दिल्याबद्दल. आपण प्रत्येकजण चुका करतो आणि आपल्याला या चुकांमधून शिकून पुन्हा बाहेर यायचं असतं. ज्यानं आपण काहीतरी आणखी चांगलं करू शकू, स्मार्ट होऊ, सहनशील आणि दयाळू होऊ शकू.’

‘बडे अच्छे...’ फेम राम कपूरनं असं कमी केलं 30 किलो वजन

 

View this post on Instagram

 

Thank you for the overwhelming love. #kabirsingh

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिद म्हणाला, ‘कबीर सिंग’ या व्यक्तीरेखेत अनेक उणीवा होत्या पण त्या प्रत्येकामध्ये असतात. पण त्यावरून तुम्ही जज केलं नाही तर त्याला समजून घेतलं. मी यावेळी प्रेक्षकांचं जेवढं प्रेम अनुभवलं तेवढं या अधी मी कधीच अनुभवलं नव्हतं. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या समजूतदारपणासाठी धन्यवाद. तुमच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास करू शकलो.

VIDEO : वयाच्या 43 व्या वर्षी सुश्मिता सेनचा फिटनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

================================================================

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या