Kabir Singh @2: ‘प्रितीला कुठे सोडलंस?’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

कबीर सिंग चित्रपटाला दोन वर्ष पुर्ण; शाहिद कपूरनं शेअर केला खास व्हिडीओ

कबीर सिंग चित्रपटाला दोन वर्ष पुर्ण; शाहिद कपूरनं शेअर केला खास व्हिडीओ

  • Share this:
    मुंबई 21 जून: कबीर सिंग (Kabir Singh) हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) जबरदस्त केमिस्ट्रीमुळं हा चित्रपट तुफान गाजला होता. शिवाय यामधील गाणी आणि डायलॉग्स यांनी तर तरुणांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. अशा या सुपरहिट चित्रपटाला आज दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. (Kabir Singh 2 year completed) त्यामुळं कबीर सिंगच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाहिद कपूरनं आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा नव्यानं उजाळा दिला आहे. शाहिदनं कबीर सिंगच्या निमित्तानं केलेल्या एका फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बाईकवर राईडिंग करताना दिसत आहे. शिवाय बॅगग्राऊंडला वडा वू वडा वू हे प्रसिद्ध म्युझिक प्ले होत आहे. या व्हिडीओद्वारे त्यानं पुन्हा एकदा कबीर सिंगच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचा हा ढासू व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत प्रिती कुठाय? असा सवाल त्याला केला आहे. Yoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम
    Reema Lagoo Birth Anniversary: मराठी अभिनेत्री कशी झाली बॉलिवूडची ग्लॅमरस आई? कबीर सिंग हा अर्जून रेड्डी या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आधी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यालाच कास्ट करण्यात येणार होतं. कारण दक्षिणेत त्याच्या अर्जून रेड्डीनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. परंतु त्यानं पुन्हा एकदा त्याच पटकथेवर काम करण्यास नकार दिला. किंबहूना त्या चित्रपटाला हिंदी डब करुन पुर्नप्रदर्शित करा असा सल्ला त्यानं निर्मात्यांना दिला होता. परंतु त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत कबीर सिंगची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटानं शाहिद कपूरच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो.
    Published by:Mandar Gurav
    First published: