किसिंग सीनबद्दल विचारलं म्हणून पत्रकारावर भडकला शाहिद कपूर, म्हणाला...

किसिंग सीनबद्दल विचारलं म्हणून पत्रकारावर भडकला शाहिद कपूर, म्हणाला...

'कबीर सिंह'च्या ट्रेलर लाँचच्या वेळी एका पत्रकारानं या सिनेमात किती किसिंग सीन आहेत असा प्रश्न कियाराला केला.

  • Share this:

मुंबई, 15 मे : अभिनेता शाहिद कपूर त्याचा आगामी सिनेमा 'कबीर सिंह'मुळे खूप चर्चेत आहे. य सिनेमात शाहिदसोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच मुंबईमध्ये या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलर लाँचला शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी दोघेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भूमिकांबाबतच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यामांशी शेअर केल्या. पण एक रिपोर्टरनं विचारलेल्या एका प्रश्नावर शाहिद चिडलेला दिसला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ट्रेलर लाँचच्या वेळी एका पत्रकारानं या सिनेमात किती किसिंग सीन आहेत असा प्रश्न कियाराला केला. हा प्रश्न ऐकल्यावर कियारा हसू लागली आणि म्हणाली मी मोजले नाही. पण त्या पत्रकारानं तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारल्यावर मात्र शाहिद कपूरला राग अनावर झाला आणि त्यानं त्या पत्रकाराला खडे बोल सुनावले. शाहिद म्हणाला, बऱ्याच काळापासून तुमची कोणी गर्लफ्रेंड नाही आहे का? तुम्ही किसिंग व्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न विचारू शकत नाही का ? आम्ही या सिनेमात अभिनय सुद्धा केला आहे.

'कबीर सिंह' दाक्षिणात्या सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. अर्जुन रेड्डी हा सिनेमा संदिप वांगा यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनीच आता 'कबीर सिंह'चंही दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला असून यातील शाहिदच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. हा सिनेमा 21 जूनला रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर एका नशेच्या आहारी गेलेल्या अशा सर्जनची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं सर्व शूटिंग दिल्ली आणि मुंबईमध्ये झालं आहे.

शाहरुख खानसोबत केलं होतं पदर्पण, आता बॉलिवूडमधून गायब आहेत 'या' 14 अभिनेत्री

VIDEO : माधुरी दीक्षितचे पाहायलाच हवेत असे 8 बेस्ट डान्स परफॉर्मन्स

First published: May 15, 2019, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading