शाहिद आणि कियाराचा हा Kissing सीन होतोय Viral

शाहिद आणि कियाराचा हा Kissing सीन होतोय Viral

या नव्या पोस्टरचं काही लोक कौतुक करत आहेत तर काहींनी त्याला सीरियल किसर हा टॅगही लावला. अनेकांनी त्याला इमरान हाश्मीदेखील म्हटलं.

  • Share this:

मुंबई, 05 जून- शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या आगामी कबीर सिंग सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. कबीर सिंगचा ट्रेलरही अनेकांना आवडला असून आता सिनेमाच्या नवीन पोस्टरनेही सिनेमाच्या नावाची चर्चा नव्याने सुरू केली आहे. या नव्या पोस्टरमध्ये शाहिद आणि कियारा एकमेकांना किस करताना दिसत आहेत. यासोबतच उद्या ६ जूनला सिनेमाचं रोमँटिक गाणं मेरे सोनेया प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर हे नवं पोस्टर शेअर केलं आहे. या नव्या पोस्टरचं काही लोक कौतुक करत आहेत तर काहींनी त्याला सीरियल किसर हा टॅगही लावला. अनेकांनी त्याला इमरान हाश्मीदेखील म्हटलं.

सलमान खानच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये वाजल्या शिट्ट्या, लोकांनी उडवले पैसे

याच महिन्यात कबीर सिंग सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच या सिनेमाबद्दलची उत्सुकता दिसून येते. २०१७ मध्ये आलेल्या तेलगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत रिमेक आहे. येत्या २१ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर या सिनेमात कबीर सिंग या मेडिकल विद्यार्थ्याची भूमिका साकारत आह. तर कियारा आडवाणी त्याची प्रेयसी दाखवण्यात आली आहे. कबीर हा फार रागीट स्वभावाचा असतो. पण त्याचं प्रितीवर (कियारा आडवाणी) अतोनात प्रेम असतं. पण अचानक प्रिती त्याच्या आयुष्यातून निघून जाते.

... म्हणून नेहमी सलमान खानचा फोटो खिशात घेऊन फिरतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता

अभिनेत्रीच्या दारुड्या नवऱ्यावर न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

प्रेमभंगापासून पळण्यासाठी डॉक्टर कबीर सिंग दारुच्या आहारी जातो आणि स्वतःच्या आयुष्याची वाताहात करून घेतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहिदचे दोन वेगवेगळे लुक दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये अक्शन सीनसोबत अनेक भावनिक दृश्यही दाखवण्यात आली आहेत. काहींनी सोशल मीडियावर सिनेमात शाहिदने साकारलेल्या मद्यधुंद व्यक्तिरेखेवर टीकाही केली. मात्र भूमिकेची गरज असल्यामुळे त्याने या सर्व गोष्टी केल्या, असं शाहिदने स्पष्ट केलं.

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

First published: June 5, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading