कियारा अडवाणीच्या रिलेशनशीप स्टेटसवर शाहिद कपूरचा मोठा खुलासा

कियारा अडवाणीच्या रिलेशनशीप स्टेटसवर शाहिद कपूरचा मोठा खुलासा

अभिनेत्री कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 जून : अभिनेत्री कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण या दोघांनीही अशा प्रकारच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणमध्ये सिद्धार्थला या विषयी विचारण्यात आल्यावर त्यानं या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता कियाराचा को-स्टार शाहिद कपूरनं तिच्या रिलेशनशीप स्टेटसबाबत मोठा खुलासा केला आहे.

OMG! या 5 अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं धोनीचं नाव

कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर कबीर सिंह सिनेमामध्ये एकत्र काम करत आहेत. नुकतच या सिनेमाचं तिसरं गाणं सोनेया लाँच झालं. यावेळी शाहिद आणि कियारा त्याठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान शाहिदला त्याच्या कॉलेज लाइफमधील रोमान्स बद्दल विचारण्यात आलं. त्यावर शाहिद म्हणाला, आता माझं लग्न झालंय त्यामुळे मी रिटायर्ड झालो आहे. मात्र माझी मैत्रिण कियारा अजूनही सिंगल आहे. त्यामुळे तिला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कियारा म्हणाली, मी सिंगल आहे, जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला प्रेमात पडावं असं वाटलं होतं पण असं काहीही झालं नाही.

Bigg Boss Marathi 2- अभिजीत बिचकुलेंनी शिवानीसाठी गायले खास गाणे...

शाहिदनं कियाराबाबत असं वक्तव्य केल्यानं आता कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रामध्ये काहीही नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 'कबीर सिंह' हा सिनेमा अर्जुन रेड्डी या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. तेलुगू सिनेमामधील अभिनेता विजय देवराकोंडानं केलेली भूमिका हिंदीमध्ये शाहिद कपूर साकारत आहे. शाहिद एका अशा डॉक्टरची भूमिका साकारत आहे, जो सतत दारूच्या नशेत राहतो आणि त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या सिनेमात कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत असून या सिनेमाच्या गाण्यांतील त्यांच्या केमिस्ट्रीवर त्यांचे चाहते आणि प्रेक्षक खूप खुश आहेत.

श्रीदेवींच्या सावत्र मुलीनं उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading