...म्हणून पुन्हा एकदा शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'ची सोशल मीडियावर चर्चा

...म्हणून पुन्हा एकदा शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'ची सोशल मीडियावर चर्चा

या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासनंही शाहिदचं कौतुक केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 8 मे : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग'मुळे प्रचंड चर्चेत आहे. सतत दारू आणि सिगरेटच्या नशेत राहणाऱ्या एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शाहिदच्या या सिनेमातील लुकचं कौतुकही झालं. त्यानंतर पुन्हा एकदा हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या सिनेमाच्या ट्रेलरची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाचा ट्रेलर 13 मेला रिलीज होणार आहे. शाहिदनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत याची माहिती दिली.
 

View this post on Instagram
 

Trailer out on 13th May! #KabirSingh . . @kiaraaliaadvani @sandeepreddy.vanga #BhushanKumar @muradkhetani #KrishanKumar @ashwinvarde @tseries.official @cine1studios @kabirsinghmovie


A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

'कबीर सिंग' सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये शाहिद कपूरच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे शेड्स पाहायला मिळाले. एकीकडे कॉलेजच्या वर्गात शिक्षक त्याचं भरभरून कौतुक करत असतात. तर दुसरीकडे तो घराच्या छतावर दारू पिताना दिसतो. तो बाइक चालवतो.. तो खेळतो... तो ऑपरेशन करतो... तो शिवीगाळ करतो.. एवढंच नाही तर तो एका मुलीच्या प्रेमातही असतो.. त्याची ही रुपं पाहून एका व्यक्तीच्या वेगवेगळ्या छटा यात दाखवण्यात आल्या आहेत. सिनेमा आणि शाहिदची व्यक्तिरेखा कशी असणार याचा अंदाज टीझर पाहून येतो. टीझरमध्ये शाहिदच्या व्यक्तिरेखेची तोंड ओळख आणि शेवटच्या सीनमध्ये कियारा अडवाणीची झलक पाहायला मिळते.या सिनेमासाठी शाहिदनं प्रचंड मेहनत घेतली आहे. यासाठी दररोज सिगरेट ओढायचा. तो दररोज २० सिगरेट आणि बिडी ओढायचा. बरं एवढंच नाही तर शरीरावर येणारा सिगरेटचा वास जाण्यासाठी तो घरी जाण्यापूर्वी आणि मुलांना भेटण्यापूर्वी किमान दोन तास आंघोळ करायचा. तसेच या सिनेमातील वेगवेगळ्या लुकसाठी शाहिदने सुरुवातीला आठ किलो वजन वाढवलं होतं आणि त्यानंतर कॉलेजमधला मुलगा वाटावा म्हणून जवळपास १२ किलो वजन कमी केलं होतं.

या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासनंही शाहिदचं कौतुक केलं होतं. हा सिनेमा 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगु सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. तेलुगु सिनेमात अभिनेता विजय देवेराकोंडा आणि अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसले होते. संदीप वांगा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा सिनेमा या वर्षी २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.

सलमानची 'ही' एक्स गर्लफ्रेंड करतेय विकी कौशलला डेट ? नेहा धुपियानं केला गौप्यस्फोट

11 वेळा आनंद आणि सोनमने दाखवून दिले काय असतात ‘कपल गोल्स’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या