News18 Lokmat

शाहिद कपूरचा नवा सिनेमा Kabir Singh चा टीझर तुम्ही पाहिलात?

टीझरमध्ये शाहिद कपूरच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे शेड्स पाहायला मिळतात. एकीकडे कॉलेजच्या वर्गात शिक्षक त्याचं भरभरून कौतुक करत असतात. तर दुसरीकडे तो घराच्या छतावर दारू पिताना दिसतो.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 09:58 AM IST

शाहिद कपूरचा नवा सिनेमा Kabir Singh चा टीझर तुम्ही पाहिलात?

मुंबई, ८ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी कबीर सिंग सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये शाहिद कपूरच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे शेड्स पाहायला मिळत आहेत. एकीकडे कॉलेजच्या वर्गात शिक्षक त्याचं भरभरून कौतुक करत असतात. तर दुसरीकडे तो घराच्या छतावर दारू पिताना दिसतो. तो बाइक चालवतो.. तो खेळतो... तो ऑपरेशन करतो... तो शिवीगाळ करतो.. एवढंच नाही तर तो एका मुलीच्या प्रेमातही असतो.. त्याची ही रुपं पाहून एका व्यक्तीच्या वेगवेगळ्या छटा यात दाखवण्यात आल्या आहेत.
 

Loading...

View this post on Instagram
 

Find the #kabirsingh within you. @kiaraaliaadvani @sandeepreddy.vanga #BhushanKumar @muradkhetani #KrishanKumar @ashwinvarde @tseries.official @cine1studios @kabirsinghmovie


A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

सिनेमा आणि शाहिदची व्यक्तिरेखा कशी असणार याचा अंदाज टीझर पाहून येतो. टीझरमध्ये शाहिदच्या व्यक्तिरेखेची तोंड ओळख आणि शेवटच्या सीनमध्ये कियारा अडवाणीची झलक पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की, या सिनेमात आधी ताराला घेण्यात येणार होते. मात्र स्टुडंट ऑफ दी इअर २ सिनेमाच्या चित्रीकरणामुळे तिला हा सिनेमा सोडावा लागला. टीझर पाहून अनेकांना शाहीदचा लुक उडता पंजाब सिनेमासारखा वाटेल.

संदीप वांगा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा सिनेमा या वर्षी २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा दाक्षिणात्या सुपरहिट सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा रीमेक आहे. या सिनेमात विजय देवराकोंडा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...