मुंबई, 13 मे- बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचा आगामी कबीर सिंग सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तेलगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. विजय देवरकोंडा स्टारर अर्जुन रेड्डी हा सिनेमा दाक्षिणात्य भागात सुपरहिट झाला होता. आजही या सिनेमाची क्रेझ तरुणाईमध्ये दिसते. संदीप वंगा दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कबीर सिंगची भूमिका साकारत आहे.
प्रेमात असणारा शाहीद आणि प्रेमभंग झाल्यानंतरचा शाहीद यांच्यातला बदल यात दाखवण्यात आला आहे. येत्या २१ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहिद बिअर्ड लूकमध्ये दिसणार आहे. सिनेमात ज्या गोष्टी नको असतात त्या सर्व गोष्टी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे या सिनेमात दारू, ड्रग्ज, शिवीगाळ या सगळ्या गोष्टींचा भडीमार आहे.
सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे
ट्रेलरमध्ये कबीर सिंग हा एक वैद्यकीय विद्यार्थी दाखवला आहे. ज्याचं त्याच्या ज्युनिअरवर (किआरा अडवानी) प्रेम असतं. मुळात कबीरचा स्वभाव हा रागीट, शीर्घकोपी असतो. स्वतःच्या भावनांवर त्याचं अजिबात नियंत्रण नसतं. प्रेमभंग झाल्यानंतर तो दारुच्या आहारी जातो. अवघ्या काही मिनिटांत हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पायांवरच्या केसांमुळे शाळेत ट्रोल व्हायची सनी लिओनी
सुरुवातीला या सिनेमातील कियारा अडवानीची व्यक्तिरेखा तारा सुतारिया साकारणार होती. मात्र स्टूडंट ऑफ दी इअर २ मुळे तिने या सिनेमाला नकार दिला. शाहिद आणि कियाराने याआधी कोणत्याही सिनेमात काम केलं नसलं तरी दोघांनी 'उर्वशी' या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केलं आहे.
‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी
दरम्यान, कबीर सिंगसाठी शाहिद कपूर दररोज सिगरेट ओढायचा. तो दररोज २० सिगरेट आणि बिडी ओढायचा. बरं एवढंच नाही तर शरीरावर येणारा सिगरेटचा वास जाण्यासाठी तो घरी जाण्यापूर्वी आणि मुलांना भेटण्यापूर्वी किमान दोन तास आंघोळ करायचा.
अचानक एक्स बॉयफ्रेंडला समोर पाहून सारा अली खानने फिरवला चेहरा
कधीही सिगरेटची जाहिरात केली नाही- उडता पंजाब सिनेमानंतर शाहिद पुन्हा एकदा नशा करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला की, ‘मी कोणत्याही प्रकारे स्मोकिंगची जाहिरात करत नाहीये. पण व्यक्तिरेखेसाठी मला हे करावं लागलं. दररोज शूटिंग दरम्यान २० सिगरेट ओढायचो. त्यामुळेच मुलांजवळ जाण्याआधी मी दोन तास आंघोळ करायचो. त्यांना सिगरेटचा वास येणार नाही याची काळजी मी घ्यायचो.’