या पाच कारणांमुळे कबीर सिंगचा केला जातोय विरोध Shahid Kapoor | Kabir Singh | Kiara Advani |

Shahid Kapoor | Kabir Singh | Kiara Advani | कबीर सिंगमध्ये शाहिदची व्यक्तिरेखा अशा एका माणसाची आहे जो आपल्या मर्जीनुसार प्रेयसीला वागवत असतो.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 01:59 PM IST

या पाच कारणांमुळे कबीर सिंगचा केला जातोय विरोध Shahid Kapoor | Kabir Singh | Kiara Advani |

मुंबई, 28 जून- शाहिद कपूरचा कबीर सिंग सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावत आहे. शाहिदचा हा पहिला सोलो सिनेमा आहे ज्याने १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. कबीर सिंग एकीकडे भरपूर पैसे कमवत असला तरी सिनेमावर टीकाही केली जात आहे. आज आम्ही तुम्हाला सिनेमाला विरोध करण्याची पाच मुख्य कारणं सांगणार आहोत.

1 कबीर सिंगमध्ये शाहिदची व्यक्तिरेखा अशा एका माणसाची आहे जो आपल्या मर्जीनुसार प्रेयसीला वागवत असतो. एवढंच नाही तर ती कोणासोबत बोलणार आणि कोणाला भेटणार हेही तोच ठरवतो. सिनेमा पाहताना प्रेयसीला तिचं असं मत नसल्याचं दिसतं. ती माणूस नसून एखादं सामान असल्यासारखं तिला वागवलं जातं.

कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का

2 सिनेमात कबीर सिंगचा राग हा वाढवून दाखवण्यात आला आहे. त्याला एवढा राग असतो की तो प्रेयसीला मारतोही. एवढंच नाही तर लग्न न केल्यामुळे तो तिला शिवीगाळही करतो. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एका मुलाचं मुलीशं असं गैरव्यवहार करणं अनेकांना पटलं नाही.

Loading...

3 या सिनेमात कबीर सिंग एका डॉक्टरच्या व्यक्तिरेखेत आहे. एक असा डॉक्टर जो दारुच्या नशेत ऑपरेशन करतो. तो एवढं मद्यपान करतो की ऑपरेशन थिएटरमध्येच बेशुद्ध होतो. डॉक्टरांना अशा पद्धतीने दाखवल्यामुळेही अनेकांनी हा सिनेमा न पाहण्याचा सल्ला दिला आहे.

4 या सर्व गोष्टी कमी की काय सिनेमात कबीर सिंग चाकूची धमकी दाखवत एका महिलेला लैंगिक संबंधांसाठी धमकावतो. या सीनची तुलना बलात्काराशी केली जात आहे. सोशल मीडियावर या सीनला कडाडून विरोध केला जात आहे.

VIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा

5 सिनेमात अजून एक सीन आहे. यात कबीर सिंग जेव्हा त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेऊ शकत नाही तेव्हा तो रागात घरातून निघून जातो आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन आपल्या पॅन्टमध्ये बर्फ टाकतो. या सीनचाही कडाडून विरोध केला जात आहे.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...